जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या ३४ रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवला.BVG India launches 34 ambulances for medical services in Jammu and Kashmir on the eve of Republic Day
विशेष प्रतिनिधी
पुणे : आपत्कालीन प्रतिसाद सेवा देणाऱ्या ‘बीव्हीजी इंडिया लि.’ या कंपनीने जम्मू आणि काश्मीरच्या ‘जेकेईएमएस १०८/१०२’ या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या ताफ्यात आणखी ३४ रुग्णवाहिका प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दाखल केल्या.जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या ३४ रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवला.
या नव्या रुग्णवाहिकांच्या समावेशामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘बीव्हीजी’च्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या आता ५११ झाली आहे.बीव्हीजी रुग्णवाहिका हा भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे.
बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सिन्हा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘जम्मू अँड काश्मीर इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस १०८/१०२’ हा जम्मू-काश्मीर सरकार आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतील उपक्रम आहे.
हा उपक्रम ४१६ रुग्णवाहिकांसह सुरू करण्यात आला होता. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, ‘बीव्हीजी’ने यात आणखी ९५ रुग्णवाहिकांची भर घातली आहे.
या उपक्रमाद्वारे १५ जानेवारीपर्यंत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली आहे, अशी माहिती हणमंतराव गायकवाड यांनी मंगळवारी दिली.जम्मू व काश्मीर राज्य सरकारने ‘बीव्हीजी’च्या या कटिबद्ध व दर्जेदार सेवेची दखल घेत कंपनीला ‘सहुलियत काश्मीर’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
रुग्णवाहिके बद्दल विशेष माहिती
१)रुग्णवाहिकेमध्ये उपचारांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांची उपस्थिती ,औषधे आणि आपत्कालीन जीवरक्षक उपकरणांची उपलब्धता .
२)सुमारे ४०० बाळांचा रुग्णवाहिकेत जन्म, १२ हजार करोना रुग्णांवर उपचार आणि ७५० रुग्णांना व्हेंटिलेटर लावणे अशा सेवा आतापर्यंत या रुग्णवाहिकांमधून देण्यात आलेल्या आहेत.
३) यामध्ये डायल १०८ सेवांतर्गत प्रगत जीवरक्षक सुविधा असलेल्या १४५ आणि मूलभूत जीवरक्षक सुविधा असलेल्या ६६ रुग्णवाहिका आहेत.
४) तसेच डायल-१०२ सेवांतर्गत ३०० रुग्णवाहिका समाविष्ट आहेत.
BVG India launches 34 ambulances for medical services in Jammu and Kashmir on the eve of Republic Day
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदके, इथे वाचा संपूर्ण यादी
- MUMBAI : मंत्रालयाच्या मुख्य गेटवर SRPF जवनाने स्वतःवर झाडली गोळी , उपचारादरम्यान मृत्यू
- मोठी बातमी : जालन्यातील शेतकऱ्यांचा अजित पवार, शिवसेनेच्या खोतकरांवर गंभीर आरोप, साखर कारखान्यातून अन्नदात्याची घोर फसवणूक
- Budget 2022 : खप वाढवण्यासाठी सरकारने नोकरदार-गरिबांना मदत करावी, कोरोना काळात फटका बसलेल्या रिटेल क्षेत्राची अर्थमंत्र्यांकडे मागणी