• Download App
    '...पण आता विरोधकांचा हा नॅरेटिव्ह चुकीचा असल्याचं सिद्ध झालंय' ; अजित पवार स्पष्टच बोलले!|But now this narrative of the opposition has been proved wrong Ajit Pawars statement

    ‘…पण आता विरोधकांचा हा नॅरेटिव्ह चुकीचा असल्याचं सिद्ध झालंय’ ; अजित पवार स्पष्टच बोलले!

    अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या योजना निवडणुकीपुरत्या नाहीत, हे जनतेपर्यंत पोहोचवायला हवं, असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुतीतील राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी मुंबईतील षणमुखानंद सभागृहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मार्गदर्शन केले.But now this narrative of the opposition has been proved wrong Ajit Pawars statement



    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘महायुतीच्या सरकारच्या काळात अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी केली. आमच्या सरकारने कायमच महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या निर्णयांना पहिलं प्राधान्य दिलं आहे. येत्या काळात देखील राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. महायुतीच्या सरकारची दमदार कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आता तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यावर आहे.’

    तसेच ‘विरोधकांनी चुकीचा नॅरेटिव्ह पसरवल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. संविधान बदलले जाणार असल्याच्या चुकीच्या नॅरेटिव्हचा निवडणुकीत फटका बसला. पण आता विरोधकांचा हा नॅरेटिव्ह चुकीचा असल्याचं सिद्ध झालंय. आता मतदारांना कळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाला मोठ्या आदराचं स्थान मिळवून देण्याचं काम केलं.’ असंही अजित पवार म्हणाले.

    याशिवाय ‘महायुतीच्या सरकारने अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केलाय. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता तो जनतेपर्यंत पोहचविण्याचं काम हाती घ्यायला हवं. अर्थसंकल्पामुळे विरोधकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे अर्थसंकल्पाबद्दल खोट्या-नाट्या गोष्टी पसरवल्या जाताहेत. लाडकी बहीण योजना- अन्नपूर्णा योजना यशस्वी होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करताहेत. मात्र विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराकडे लक्ष न देता आपण सकारात्मक राहायचं. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जायचं.’ असं आवाहन केलं.

    याचबरोबर ‘अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या योजना निवडणुकीपुरत्या नाहीत, हे जनतेपर्यंत पोहोचवायला हवं. आजपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सरकारने केलेली कामं आणि अर्थसंकल्पातील योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. फक्त विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचंय. मला महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचंय की लोकांना योजनांचे फॉर्म भरण्यासाठी आणि शक्य ती सर्व मदत करा. महायुतीतील घटक पक्षाचे कार्यालय लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा.’ असं मार्गदर्शन अजित पवारांनी केलं.

    तसेच, ‘मला कार्यकर्त्यांना अजून एक गोष्ट सांगायची आहे की विरोधी पक्षांनी कितीही नकारात्मक प्रचार केला, तरी आपला प्रचार सकारात्मक असेल याची काळजी घ्या. मात्र विरोधकांकडून अपप्रचार केला जात असेल, तर त्याचा वेळीच प्रतिवाद करा. तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला जाऊया आणि पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी ताकतीने लढूयात.’ असा आशावाद अजित पवारांकडून व्यक्त केला गेला.

    But now this narrative of the opposition has been proved wrong Ajit Pawars statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस