• Download App
    घर खाेदकामात साेन्याची नाणी मिळाल्याचे सांगत व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणुक|Businessman cheated by unknown three persons for ११ lakhs rupees

    घर खाेदकामात साेन्याची नाणी मिळाल्याचे सांगत व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणुक

    घराचे खाेदकाम करत असताना साेने व चांदीची नाणी माेठया प्रमाणात सापडली असल्याचा बहाणा दाेन अनाेळखी इसम व एक अज्ञात महिला यांनी करुन व्यापाऱ्याकडून ११ लाख रुपये स्विकारुन त्याची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे –घराचे खाेदकाम करत असताना साेने व चांदीची नाणी माेठया प्रमाणात सापडली असल्याचा बहाणा दाेन अनाेळखी इसम व एक अज्ञात महिला यांनी करुन व्यापाऱ्याकडून ११ लाख रुपये स्विकारुन त्याची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पाेलीस ठाण्यात घनशाम विठ्ठलदास लढढा (वय-६३) यांनी एका महिलेसह तीनजणां विराेधात फिर्याद दाखल केली आहे. Businessman cheated by unknown three persons for ११ lakhs rupees

    घनशाम लढढा यांचे पुण्यातील बुधवार पेठ येथे दुकान असून रविवार पेठेत ते राहतात. ए्क ते २० मार्च दरम्यान दाेन अनाेळखी व्यक्ती व एक महिला त्यांना दुकानात व घरी येऊन भेटले. त्यांनी त्यांना सांगितले की, घराचे खाेदकाम करतेवेळी चांदीची व साेन्याची नाणी सापडली आहे. त्यानंतर त्यांनी प्रथम चांदीची व त्यानंतर साेन्याची खरी नाणी तपासणीसाठी देवून व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला.



    त्यानंतर त्यांचे घरी येवून एका कापडी पुरचुंडीत पिवळे रंगाचे धातूची एक किलाे वजनाची नाणी देवून त्याबदल्यात त्यांचेकडून राेख ११ लाख रूपये घेतले व संबंधित व्यक्ती पसार झाल्या. सराफाने सदर पिवळा धातु गाळणेस दिला असता ताे लाेखंडी धातू असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पाेलीसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दिली आहे. फरासखाना पाेलीस यासंर्दभात पुढील तपास करत आहे.

    Businessman cheated by unknown three persons for ११ lakhs rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा