• Download App
    वेडीवाकडी, सुसाट धावणाऱ्या बसचा व्हिडीओ व्हायरल|Bus in Bad condition, video goes viral

    वेडीवाकडी, सुसाट धावणाऱ्या बसचा व्हिडीओ व्हायरल

    औरंगाबाद – धुळे रस्त्यावरचा थरार मोबाईलमध्ये कैद


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबाद – धुळे रस्त्यावर वेडीवाकडी आणि सुसाट धावणाऱ्या एका एसटी बसचा थरार चित्रित झाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहेऔरंगाबाद स्थानकातून सुटलेली ही बस पडेगाव रस्त्यावरून धुळ्याच्या दिशेने धावत होती.Bus in Bad condition, video goes viral

    या बसच्या धडकेत एक दुचाकीचालक जखमी झाला. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. बसमधील २९ प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाविरोधात छावणी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.



    गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील साहेबसिंग भाऊसिंग कवाळे (५५) हे दुचाकीस्वार जखमी झाले. मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत पागरपत्रक जमा करण्यासाठी ते जात होते. एसटी बसचालक दीपक रमेश पाटील (३८, रा. फागणे, ता. जि. धुळे) हे बस (एमएच न १४ डीटी २११९) घेऊन दुपारी तीन वाजता औरंगाबाद बसस्थानकावरून धुळ्याकडे निघाले होते.

    रस्त्यातच बसच्या चेसीचा बोल्ट निखळला आणि चाके एका दिशेने आणि बॉडी दुसऱ्या दिशेने जात असल्याने बस वेडीवाकडी धावत होती. रस्त्यावरील अनेकांना हा प्रकार लक्षात आला, मात्र चालकाने दुर्लक्ष करून बस पळवली. ल बस सुरुवातीला एका दुचाकीस्वाराला हुलकावणी दिल्यानंतर चालकाला नेमके काय झाले हे लक्षात आले, परंतु तरीही त्याने बस सुसाट दामटली. दुसरीकडे एका दुचाकीचालकाने मोबाइलमधून चित्रीकरण सुरू केले.

    इतर जण बसला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा दुचाकीचालक कवाळे यांना बसने धडक दिली. कवाळे रस्त्यावर कोसळल्यानंतर चालकाने बस थांबवली. हेल्मेट घातल्याने कवाळे सुरक्षित राहिले. या प्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार के. बी. काळे करीत आहेत.

    •  वेडीवाकडी, सुसाट बसचा व्हिडीओ व्हायरल
    • औरंगाबाद – धुळे रस्त्यावर धावली सुसाट बस
    • रस्त्यातच बसच्या चेसीचा बोल्ट निखळला
    • चाके एका दिशेने आणि बॉडी दुसऱ्या दिशेने
    • वेडीवाकडी धावणारी बसचालकाने दामटली
    • बसमधील २९ प्रवाशांचा जीव धोक्यात घातला
    • दुचाकीचालक कवाळे यांना बसने धडक दिली
    • अखेर चालकावर पोलिसात गुन्हा दाखल

    Bus in Bad condition, video goes viral

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!