• Download App
    सांगलीत बंटी-बबलीने घातला ५३ लाखांचा गंडा; स्वस्तात सोन्याचे आमिष; सहा जणांना फसविले|Bunty-Babli Cheated Rs 53 lakh in Sangli; The lure of cheap gold; Cheated on six people

    सांगलीत बंटी-बबलीने घातला ५३ लाखांचा गंडा; स्वस्तात सोन्याचे आमिष; सहा जणांना फसविले

    वृत्तसंस्था

    सांगली : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून सांगलीमध्ये सहा जणांना एका दाम्पत्याने ५२ लाख ९० हजाराचा गंडा घातला आहे. १० हजाराने सोने स्वस्त मिळेल, असे सांगून या बंटी-बबली जोडीने काही लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले.  विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे, अशी त्यांची नावे आहेत.Bunty-Babli Cheated Rs 53 lakh in Sangli; The lure of cheap gold; Cheated on six people

    सांगली पोलिस ठाण्यात कोकणे दाम्पत्यावर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पण, हे दाम्पत्य पैसे घेऊन फरार झाले आहे. मोबाईल बंद ठेवून संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.



    झटपट श्रीमंत होण्याचे आमिष महागात

    फिर्यादी भास्कर मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने सोने दहा हजारने स्वस्त देण्याचे आमिष दाखविले.

    आणखी काही लोकांना पैसे गुंतवण्यास सांगितले.लोकांनी लाखोंनी पैसे गुंतवले. काहींनी तर बँकेतील आणि मित्राकडून उसने पैसे घेऊन कोकणेला दिले होते.
    सुरुवातीला कोकणे याने भास्कर मुळीक यांना तीन तोळे सोने आणि या सोन्याची पावती दिली.

    खात्री पटल्याने मुळीक यांनी पुन्हा काही रक्कम दिली. पण, कोकणेने सोने आणून दिलेच नाही. यानंतर दांपत्य गायब झाले. मुळीक यांच्या प्रमाणे अन्य लोकांचीही कोंकणे याने फसवणूक केली.

    कुणी ८ लाख, कुणी ५ लाख तर कुणी १० – १४ लाख कोकणेला दिले आहेत. सहा लोकांचा फसवणुकीचा आकडा हा ५३ लाखाच्या जवळ गेला आहे. तर अनेकजण तर बदनामीच्या भीतीमुळे तक्रार देण्यास पुढे आलेले नाहीत.

    Bunty-Babli Cheated Rs 53 lakh in Sangli; The lure of cheap gold; Cheated on six people

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस