प्रतिनिधी
मुंबई : भारतीय टपाल खात्यात बंपर भरती करण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन, मेल गार्डसह अनेक पदांवर ही भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना इंडिया पोस्टाच्या https:www.indiapost.gov.in/ या वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे. नोकर भरतीसाठी पोस्टाने ऑफलाइन अर्ज मागवले आहेत.BUMPER RECRUITMENT IN INDIA POST OFFICE; 98000 Vacancies Apply!
पोस्टाच्या रिक्त जागांची माहिती
भारतीय टपाल विभाग या भरतीद्वारे ९८ हजार ८३ नोकऱ्या देणार आहे. देशभरातील २३ मंडळांमध्ये पोस्ट ऑफिसच्या नोकऱ्यांसाठी सरकारने परवानगी दिली आहे.
शैक्षणिक पात्रता
टपाल खात्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरूणांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. यासोबत संबंधिताला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पोस्टाच्या वेबसाइटवर पहावी.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०२२
अर्ज प्रक्रिया
टपाल विभागाच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.inया अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
BUMPER RECRUITMENT IN INDIA POST OFFICE; 98000 Vacancies Apply!
महत्वाच्या बातम्या
- Bhandara Flood Updates : भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था
- पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८, तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद
- पावसाळी अधिवेशन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटींची तरतूद, 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या
- विधान परिषदेच्या सभापतीपदाची लढाई…; पण त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी!!