प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मढ मार्वेमध्ये बेकायदा स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मढ – मार्वेतील बेकायदा स्टुडिओंवर बुलडोझर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. कोविडच्या काळात स्थानिक आमदार अस्लम शेख आणि मुंबईचे तत्कालीन पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कृपेने मढ येथे समुद्र किनारी अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. Bulldozers on unauthorized studios in Madh
महापालिकेने चालविले बुलडोझर
याच पार्श्वभूमीवर हे स्टुडिओ पाडण्याचे काम सकाळपासूनच सुरू झाले. महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात येते असून, ठाकरे सरकारच्या कृपेने डझनभर अनधिकृत स्टुडिओ मालाडमध्ये उभे राहिले, या सर्व स्टुडिओला परवानगी आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने दिली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई पालिकेने आओ जाओ घर तुम्हारा, मातोश्रीवर हिशेब द्या, असा प्रकार सुरू होता असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पण आता हे स्टुडिओ पाडण्याचे काम सुरू झाले आहे ‘मोदी है तो मुमकीन है’ असेही सोमय्या म्हणाले.
आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघांनी मिळून स्टुडिओला परवानगी दिली होती. या सर्व गोष्टींमागे अस्लम शेख म्हणजेच काँग्रेसचा हात आणि वांद्र्याची नोट मोजण्याची मशीन यांची आघाडी होती, असा हल्लाबोल किरीट सोमय्यांनी केला आहे.
Bulldozers on unauthorized studios in Madh
महत्वाच्या बातम्या
- Indian Space Policy 2023 : मोदी सरकारची ‘भारतीय अंतराळ धोरण 2023’ला मंजुरी
- COVID19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८०० पेक्षा अधिक नवीन करोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू
- Aadhar-PAN : ‘या’ तारखेपर्यंत जर पॅनकार्ड आधार कार्डशी जोडले नाही, तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होणार!
- केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित घरगुती गॅस किंमत मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी – अनुराग ठाकूर