प्रतिनिधी
सातारा : किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर परिसरातील बेकायदा बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. महसूल विभाग आणि वनविभागाने पहाटे 4 वाजेपासूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सुमारे 1500 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे बांधकाम हटविले. Bulldozers on illegal construction near Shivpratapadini Afzal Khan’s grave
विशेष म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 लाच सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. या दिनाचे औचित्य साधतच राज्य सरकारने ही कारवाई केली आहे.
परिसरात कलम 144
अफजल खानाच्या कबरीच्या सुशोभीकरणावरुन यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. पुर्वी काही चौरस मीटरमध्ये असलेली ही कबर आता काही एकरांत पसरली आहे. यावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी हे बांधकाम हटवावे अशी मागणी केली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी हा परिसर संपूर्ण परिसर 2006 पासून सील करण्यात आला होता. हा परिसर खुला करावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत होती. हा वाद न्यायालयातही गेला होता.
पर्यटकही हटवले
अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार हे अनधिकृत बांधकाम कडेकोट बंदोबस्तात हटवली आहेत. या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे.
कबरीचे उदात्तीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून किल्ले प्रतापगडच्या पायथ्याची असलेल्या अफजलखानाच्या कबरीकडे पाहिले जाते. मात्र काही वर्षांपासून येथील अतिक्रमण वाढले होते व त्याचे उदात्तीकरणही झाले. अनेकदा कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचा विषय म्हणून हे प्रकरण ऐरणीवर आले होते. याच कारणामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीण, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे 1500 पोलीस तैनात करण्यात आले होते आणि त्यांच्या बंदोबस्तात पहाटे चार वाजल्यानंतर अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई सुरू केली.
सर्वोच्च न्यायालयाने कबरीसमोरील बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारकडून यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख हे साताऱ्यात बदलून आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच ही मोठी कारवाई हाती घेतली आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असल्याने कोठेही तणावाचे वातावरण नाही, असे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. स्थानिक तसेच पत्रकारांनाही येथे जाण्यास सध्या बंदी करण्यात आली आहे.
इतिहास काय?
१० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशहाचा सरदार अफजलखान याला मारले होते. या विजयाचे प्रतीक म्हणून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबर येथे बांधली होती. परंतु गेल्या काही वर्षात या कबरीभोवती बांधकामे वाढली होती आणि त्याचे उदात्तीकरण झाले.
खरा इतिहास समोर येईल
मात्र, आजच्या कारवाईबद्दल शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. काही शिवप्रेमींनी म्हटले आहे. अफजल खानाच्या कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. आजच्या कारवाईनंतर हा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल.
Bulldozers on illegal construction near Shivpratapadini Afzal Khan’s grave
महत्वाच्या बातम्या
- राजकीय स्तर खालावल्याचे राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र; अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादी महिला नेत्याचे 10 लाखांचे बक्षीस
- 18000 पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल
- वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल; न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश