वृत्तसंस्था
पुणे : बेकायदा परदेशात रक्कम पाठविणे बिल्डर अविनाश भोसले यांच्या अंगलट आले आहे. यापूर्वी त्यांच्या ४०.३४ कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) टाच आणली होती. आता आणखी ४ कोटींची संपत्ती जप्त केली. परदेश चलन नियंत्रण कायदा १९९९ चे उल्लंघन केल्याप्रकरणी(मनी लाँड्रिंग) ही कठोर कारवाई केली आहे.Builder Avinash Bhosale’s assets worth Rs 4 crore confiscated
याआधी ईडीने अविनाश भोसले यांना समन्स बजावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुद्धा सुरु होती. आता ईडीने त्यांची 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शिवाजीनगर येथील गणेशखिंड येथे असलेल्या ऑफिसच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
ईडीने याआधी अविनाश भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. परदेश चलन नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत ही कारवाई केली होती.
अविनाश भोसले यांच्यासह कुटुंबियांनी FEMA चे उल्लंघन करून ठेवलेल्या फॉरेन सिक्युरिटीज जप्त केल्या होत्या. आता भारताबाहेर असलेल्या फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्थावर मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.
Builder Avinash Bhosale’s assets worth Rs 4 crore confiscated
महत्त्वाच्या बातम्या
नारायण राणे कोकणासह मुंबईमध्येही घेणार जन आशीर्वाद सभा; २० ऑगस्टपासून दौरा