10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Budget session महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार असून दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. रविवारी विधानभवनात आयोजित विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.Budget session
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार 8 मार्च सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर 13 मार्च होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
Budget session to begin from March 3
महत्वाच्या बातम्या
- Prime Minister Modi पंतप्रधान मोदींनी भाजपच्या आमदार, खासदारासंह पदाधिकाऱ्यांना दिला मंत्र, म्हणाले…
- महाराष्ट्राच्या राजकारणातले “हलके” आणि “जड”; पण दिल्लीत रेटून जम बसवलेल्या गुजरात्यांपुढे सगळेच शरण!!
- मोदी + पवार गुळपीठावर मराठी साहित्यिकांची आणि संमेलन संयोजकांची तोंडे शिवली; पण त्यांनी शिंदे + गोऱ्हेंवर तोफ डागली!!
- Atishi : आतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, दिल्ली विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू