• Download App
    बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये फक्त 107 दिवसांत 1 कोटी गुंतवणूकदारांची भर, तब्बल 8 कोटींचा टप्पा पार । BSE adds 1 crore investor accounts in just 107 days to cross 8 crore mark

    बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये फक्त 107 दिवसांत 1 कोटी गुंतवणूकदारांची भर, 8 कोटींचा टप्पा पार, कोरोना काळात शेअर बाजाराला पसंती

    BSE adds 1 crore investor accounts in just 107 days : देशातील प्रमुख शेअर बाजार BSEने 6 जून ते 21 सप्टेंबर या अल्प काळात एक कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली आहेत. यासह गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्या केवळ 107 दिवसांत 8 कोटींच्या वर पोहोचली आहे. यापूर्वी 6 जून रोजी स्टॉक एक्स्चेंजने म्हटले होते की, त्यांच्या रजिस्टर्ड युजर बेसने 7 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी 23 मेपासून म्हणजे 12 महिन्यांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत, दोन कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली गेली आहेत. BSE adds 1 crore investor accounts in just 107 days to cross 8 crore mark


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशातील प्रमुख शेअर बाजार BSEने 6 जून ते 21 सप्टेंबर या अल्प काळात एक कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली आहेत. यासह गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्या केवळ 107 दिवसांत 8 कोटींच्या वर पोहोचली आहे. यापूर्वी 6 जून रोजी स्टॉक एक्स्चेंजने म्हटले होते की, त्यांच्या रजिस्टर्ड युजर बेसने 7 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी 23 मेपासून म्हणजे 12 महिन्यांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत, दोन कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली गेली आहेत.

    या संदर्भात, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष कुमार चौहान म्हणाले की, इक्विटी गुंतवणूक थेट किंवा म्युच्युअल फंडांद्वारे दीड वर्षांपेक्षा जास्त काळात वाढली आहे. जागतिक पातळीवर याची अनेक कारणे आहेत आणि देशांतर्गत बाजारपेठही या ट्रेंडला फॉलो करत आहे.

    गुंतवणूक करताना घ्या काळजी

    बाजारात गुंतवणूक करण्याबाबत सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ते म्हणाले की, प्रत्येक गुंतवणूकदारासाठी हे महत्त्वाचे आहे की, गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्याकडे कंपनीबद्दल संपूर्ण माहिती असावी आणि ज्या उत्पादनामध्ये तो गुंतवणूक करणार आहे, त्याची संपूर्ण माहिती ठेवावी.

    असे वाढले गुंतवणूकदार

    • फेब्रुवारी 2008 मध्ये एक्स्चेंजमध्ये फक्त एक कोटी गुंतवणूकदारांची खाती होती. जुलै 2011 पर्यंत हे वाढून 2 कोटी झाले.
    • बीएसईला जानेवारी 2014 मध्ये 3 कोटींवर नेण्यासाठी जवळपास 3 वर्षे लागली आणि ऑगस्ट 2018 मध्ये 4 कोटींचा टप्पा पार केला.
    • मे 2020 मध्ये 5 कोटी, 19 जानेवारी 2021 रोजी 6 कोटी आणि 6 जून 2021 रोजी 7 कोटींचा टप्पा पार केला.
    • 21 सप्टेंबर 2021 रोजी 8 कोटींची पातळी ओलांडली. ही सर्वात वेगवान वाढ होती. अवघ्या 107 दिवसांत एक कोटी खाती जोडली गेली.

    शेअर बाजारात ऐतिहासिक विक्रमी तेजी

    बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सदेखील अलीकडच्या आठवड्यात झपाट्याने वाढला आहे. मार्च 2020 मध्ये महामारीनंतर, निर्देशांक 110 टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि 59,000ची पातळी ओलांडली आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या तीन सत्रांत सेन्सेक्स 57,000 वरून 58,000 वर गेला आहे आणि 16 सप्टेंबर रोजी आठ दिवसांत 59,000 चा आकडा पार केला आहे. सेन्सेक्सने यावर्षी जानेवारीतच 50,000 चा आकडा पार केला.

    यासह भारत आता जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार झाला आहे, भारतीय बाजाराने बाजार भांडवलामध्ये प्रथमच फ्रान्सला मागे टाकले आहे. सेन्सेक्स या वर्षी आतापर्यंत 23.85 टक्क्यांनी म्हणजेच 11,389.83 अंकांनी वाढला आहे. 16 सप्टेंबर रोजी बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल वाढून 3.54 लाख कोटी डॉलर म्हणजेच 260.78 लाख कोटी रुपये झाले.

    BSE adds 1 crore investor accounts in just 107 days to cross 8 crore mark

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक