एनसीबीने असंही म्हटलं आहे की, ‘चॅट्समध्ये अनेक कोड नेम सापडले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी आम्हाला कस्टडीची आवश्यकता आहे.BREAKING AARYAN KHAN: ‘Shocking photo found in Aryan’s phone: 11Give custody till October: NCB’s demand
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सापडलेल्या ड्रग्सप्रकरणी शाहरूख खान मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं होत.
NCB कडून थेट ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी का ?
आर्यन खानची कोठडी मागताना एनसीबीने असं म्हटलं आहे की, आर्यनच्या फोनमध्ये काही धक्कादायक फोटो सापडले आहेत जे आक्षेपार्ह आहेत.म्हणून एनसीबीने चौकशी करण्यासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी.
एनसीबीने असंही म्हटलं आहे की, ‘चॅट्समध्ये अनेक कोड नेम सापडले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी आम्हाला कस्टडीची आवश्यकता आहे. लिंक आणि नेक्सस समोर आणण्यासाठी देखील कस्टडीची गरज आहे. कारण यांच्या फोनमधून ड्रग्स तस्करांसोबत व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चॅट्स आढळून आलं आहे. याप्रकरणी छापेमारी देखील सुरु आहे.
यावेळी एनसीबीने कोर्टात असंही म्हटलं आहे की, आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून पैशांचा व्यवहार झाल्याचं देखील समजतं आहे. चॅटमधून असंही समोर आलं आहे की, त्याने बँक ट्रांझेक्शनसाठी कॅशची देखील मागणी केली आहे.
आर्यन खानच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता
आर्यनच्या फोनमधून काही लिंक मिळाल्या आहेत की, जे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीकडे इशारा करत आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
BREAKING AARYAN KHAN: ‘Shocking photo found in Aryan’s phone: 11Give custody till October: NCB’s demand
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case: आर्यन खान दोषी सिद्ध झाल्यास इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा, एवढा दंडही भरावा लागू शकतो
- आर्यन खानचे इंटरनॅशनल ड्रग तस्करीचे पुरावे मिळाले? एनसीबीने मागितली 7 दिवसांची कस्टडी
- 2021 Nobel Prize : शरीरविज्ञानातील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे डेव्हिड ज्युलियस आणि आर्डम पातापुतियन यांना जाहीर
- दादा मला सोडा…’ ; प्राणांची भीक मागत होता लखीमपूर घटनेतला ड्रायव्हर, जमावाने केली हत्या