विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद मुंबई – महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि सुप्रीम कोर्टातून आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन धडकला आहे. चोरमंडळ विरुद्ध भाडखाऊ अशा शब्दांच्या हत्यारांसह बाळासाहेबांचे अनुयायी एकमेकांवर तुटून पडले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या खऱ्या विरोधकांवर तुटून पडण्याऐवजी आपले अनुयायी एकमेकांमध्येच भांडत असल्याचे पाहून वरती बाळासाहेबांना मात्र “धन्य धन्य” वाटले असेल!! Both disciples of balasaheb Thackeray Sanjay Raut and bharat gogawale used abusive language rocked maharashtra legislative assembly
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे गदारोळ झाला. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधीमंडळाला चोरमंडळ म्हटले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय राऊतांच्या विधानावर सत्ताधारी आक्रमक झाले. त्यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्तावच मांडला. या प्रस्तावावर 8 मार्च रोजी निर्णय होणार आहे.
पण संजय राऊत यांनी चोरमंडळ म्हटल्याबरोबर खवळलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी त्यावर कडी करत भाडखाऊ शब्द भर विधानसभेत वापरला. भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका करताना ‘भाडखाऊ’ शब्द वापरल्याने एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी हा शब्द मागे घेण्याची मागणी केली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात सभागृह अनेक वेळा तहकूब करावे लागले.
Sanjay Raut : संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे इंदिराजी – देवकांत बरुआंची आठवण!!
काय म्हणाले संजय राऊत?
विधीमंडळामध्ये बनावट शिवसेना आहे. हे विधीमंडळ नाही. चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने, बाळासाहेब, उद्धव साहेबांनी दिली. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदे गेली तर परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असे संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
भरत गोगावले म्हणाले ‘भाडखाऊ’
संजय राऊत यांच्या विधानावर विधानसभेत बोलताना भरत गोगावले म्हणले की प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असते. प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर अती तिथे माती हे ठरलेले आहे. हक्कभंग व्हायलाच पाहिजे. लोकांच्या भावना भडकत आहेत. बाहेर प्रक्षोभक वातावरण होऊ द्यायचे नसेल तर कारवाई झालीच पाहिजे. या माणसाला अधिकार कोणी दिला? हे स्वत:ला इतके शहाणे समजत आहेत? माणसाने भाड खावी. भाड खायला पाहिजे पण इतका भाडखाऊपणा नको. संजय राऊत यांच्यावर कारवाई करा.
भरत गोगावलेंनी भाडखाऊ शब्द वापरल्यामुळे ठाकरे गटाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार भडकले. त्यांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. कामकाज शेवटी तहकूब करावे लागले.
पण ज्या बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते तावातवाने वारसा सांगत आहेत, त्यांचेच अनुयायी चोरमंडळ आणि भाडखाऊ म्हणून एकमेकांवर तुटून पडत असतील, तर वरती बाळासाहेबांना “धन्य धन्य” वाटले असेल!!
Both disciples of balasaheb Thackeray Sanjay Raut and bharat gogawale used abusive language rocked maharashtra legislative assembly
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे दिल्लीतील मंत्रिपदांचे राजीनामे; पण नवाब मलिकांनी अखेरपर्यंत दिला नव्हता राजीनामा!!
- मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाची फटकार; हायकोर्टात जायचे सोडून थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात??
- सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज