• Download App
    महाराष्ट्रातील कोरोना प्रतिबंधक उपायांवर उच्च न्यायालय निराश; सुनावणीत केले अनेक प्रश्न उपस्थित Bombay high court pulled up Thackeray - pawar govt over corona issue

    महाराष्ट्रातील कोरोना प्रतिबंधक उपायांवर उच्च न्यायालय निराश; सुनावणीत केले अनेक प्रश्न उपस्थित

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील कोरोना प्रतिबंधक उपायांविरोधात विविध जनहित याचिका दाखल झाली असून राज्याच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत न्यायालय निराश झाले आहे. आदेशात स्पष्टता असूनही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना असमाधानकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या युक्तिवादावर ही टिपणी केली आहे. Bombay high court pulled up Thackeray – pawar govt over corona issue

    महाराष्ट्रात पुरेसा ऑक्सिजन असल्याची राज्य सरकारने कबुली दिली. राज्याला १७०० मे. टन ऑक्सिजनची गरज आणि १७७९ मे. टन उपलब्ध आहे, असे सरकारी वकील अक्षय शिंदे यांनी उच्च न्यायालयात सांगितले.



    राज्याने वेळीच पुरेशा रेमेडिसीविर का अधिग्रहित केल्या नाहीत?, असे न्यायालयाने विचारले. रेमेडिसीविरबाबत ३/७/२०२० रोजीच वैद्यकीय आचारसंहिता घोषित केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. राज्याला ७० हजार रेमेडिसीविर हव्यात हे कुठून शोधून काढलेत?, तसेच सक्रिय रुग्ण वाढत असताना रेमेडिसीविरची मागणी का घटवली? असे मुख्य न्यायाधीश दत्ता यांनी विचारले.

    रुग्णालयातच रेमेडिसीविर देण्याचे राज्य सरकारचे आश्वासन अधांतरीच असल्याची टीका ऍड. इनामदार, याचिककर्त्याचे वकील यांनी केली. आमचे रेमेडिसीविरबाबतचे आदेश पाळले का जात नाहीत? तसेच रेमेडिसीविर बाहेरून आणायचा आग्रह रुग्णालयांकडून का धरला जातोय?, असे न्यायालयाने विचारले रुग्णालयांनी आदेश पाळणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

    Bombay high court pulled up Thackeray – pawar govt over corona issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!