Elgaar Parishad case : एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. न्यायालयाने त्याच्या आत्मसमर्पणासाठी दिलेली मुदत 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. तोपर्यंत त्यांना तळोजा कारागृह अधिकाऱ्यांसमोर शरण जाण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. Bombay high court extends time to surrender for Varavara Rao till 28th October in Elgaar Parishad case
वृत्तसंस्था
मुंबई : एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. न्यायालयाने त्याच्या आत्मसमर्पणासाठी दिलेली मुदत 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. तोपर्यंत त्यांना तळोजा कारागृह अधिकाऱ्यांसमोर शरण जाण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाने गुरुवारी राव यांना आत्मसमर्पण करण्याची दिलेली मुदत 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आणि सांगितले की, न्यायालय 26 ऑक्टोबरला पुढील सुनावणी करेल. त्यांना दिलेल्या जामिनाची मुदतवाढीची सुनावणी 26 ऑक्टोबरला होईल, असेही खंडपीठाने म्हटले आहे. राव (82) यांना उच्च न्यायालयाने या वर्षी 22 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आधारावर सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला होता.
जामिनाची मुदत वाढवण्याची विनंती
ते 5 सप्टेंबरला आत्मसमर्पण करून न्यायालयीन कोठडीत परतणार होते. तथापि, राव यांनी त्यांचे वकील आर सत्यनारायण आणि अधिवक्ता आनंद ग्रोव्हर यांच्यामार्फत गेल्या महिन्यात जामीन वाढवण्यासाठी विनंती अर्ज केला होता. जामिनावर तुरुंगाबाहेर असताना राव यांनी त्यांच्या मूळ गावी हैदराबादमध्ये राहण्याची परवानगीही मागितली होती. याचिकेत पुढे म्हटले आहे की, ते मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहे, ज्यामुळे त्यांच्या इतर खर्चासह पेन्शनवर अवलंबून राहणे कठीण होते.
एनआयएकडून चौकशी
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) एल्गार परिषद-माओवादी संबंधांची चौकशी करत आहे. एनआयएने राव यांच्या वैद्यकीय जामिनाला मुदतवाढ देण्यास आणि हैदराबादला जाण्याची परवानगी देण्याच्या विनंतीला विरोध केला, कारण त्यांच्या वैद्यकीय अहवालात त्यांना कोणताही गंभीर आजार असल्याचे सूचित होत नाही. उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या जामीनच्या कठोर अटींमध्ये राव आपल्या पत्नीसह मुंबईत एका भाड्याच्या घरात राहतात.
Bombay high court extends time to surrender for Varavara Rao till 28th October in Elgaar Parishad case
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीर, ड्रग्ज तस्करी आणि ओटीटीपर्यंत, जाणून घ्या – सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संबोधनातील 5 मोठे मुद्दे
- 200 कोटींच्या मनी लाँडरिंगप्रकरणी नोरानंतर ईडी आज जॅकलिन फर्नांडिसची करणार चौकशी
- सिंघू बॉर्डरवर तरुणाची हत्या, आधी हात कापला, मग गळा चिरला; शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर लटकावला मृतदेह
- पंतप्रधान मोदींनी मिसाइल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन , म्हणाले – नेहमी लोकांसाठी प्रेरणा राहील
- पंतप्रधान मोदींनी मिसाइल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन , म्हणाले – नेहमी लोकांसाठी प्रेरणा राहील