नाशिक : “बाहेर”च्या सिनेमांनी ज्यावेळी बॉलिवूडची बॉक्स ऑफिसवरली दादागिरी मोडून काढली… मराठी, तेलगु, तमिळ, मल्याळम सिनेमांनी जगावर प्रभाव टाकला… तेव्हा आता बॉलिवूडकरांनाच “बॉलिवूड” हे नाव नकोसे झाले आहे…!! बॉलिवूड बाहेरचे भाषिक सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात बिझनेस करत असल्याने बॉलिवूडकर पुरते हादरले आहेत… आणि ते स्वतःचे बॉलिवूड हे नावच टाकायला निघाले आहेत…!!Bollywood: After the movies of “Bahar” broke the box office, now Bollywood people don’t like the name “Bollywood”
आता आम्हाला बॉलिवूड म्हणू नका. कारण बॉलिवूड हा शब्द हॉलिवूड पासून आला आहे, असा “साक्षात्कार” करण जोहर यांना झाला आहे…!! एबीपी माझा इंडिया कार्यक्रमात करण जोहर यांनी बॉलीवूड म्हणू नका असे म्हटले आहे.
- The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!
सिनेमा इंडस्ट्री बॉम्बेत आहे म्हणून तिला बॉलिवूड म्हटले गेले. पण आता “इंडियन फिल्म इंडस्ट्री” असे म्हणले पाहिजे कारण आता मराठी, तमिळ तेलुगू, मल्याळम या सिनेमाचा प्रभाव वाढतो आहे. बाहुबलीचे निर्माते राजामौली हे सध्या भारतातील सर्वश्रेष्ठ निर्माते आहेत, असे करण जोहर याने या कार्यक्रमात सांगितले.
बाहुबली, पुष्पा त्यानंतर द काश्मीर फाइल्स आणि आता आर आर आर या सिनेमांचे कलेक्शन बॉलिवुडच्या कुठलाही सिनेमा पेक्षा जास्त झाले आहे. मराठीत देखील नटरंग, बालगंधर्व, लोकमान्य, सैराट, हिरकणी, पावनखिंड आदी सिनेमांचा जबरदस्त बोलबाला झाला आहे. दक्षिणेतल्या निर्मात्यांनी तर बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडच्या बड्या निर्माते दिग्दर्शकांना केव्हाच मागे टाकले आहे.
बॉलिवूडची दादागिरी मोडीत
या पार्श्वभूमीवर करण जोहर याने बॉलिवूडला आता “बॉलिवूड” अस म्हणू नका, असे म्हटले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उर्दू सिनेमा लाहोरला गेल्यापासून मुंबई सिनेसृष्टीला बॉलिवूड म्हणले जाते. गेली 70 वर्षे भारतीय सिनेसृष्टीवर बॉलिवूडची दादागिरी आहे. बॉलिवूडमध्ये अनेक माफियांचा काळा पैसा गुंतला आहे.
70 वर्षे नाव चालले पण…
गेली 70 वर्षे करण जोहर सारख्या निर्मात्यांना बॉलिवूड हे नाव चालत होते. इतर सिनेमांना ते खिजगणतीत धरत नव्हते. परंतु गेल्या काहीच वर्षात तेलुगू, तमिळ, मल्याळम सिनेमाचा प्रभाव वाढायला लागला. बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे सिनेमे त्यांच्यापुढे मागे पडायला लागले. बॉक्स ऑफिसवरची बॉलिवूडची दादागिरी मोडीत निघाली तेव्हा आता करण जोहर यांच्या सारख्या निर्मात्यांचे डोळे खाडकन उघडले आहेत…!! आता आम्हाला बॉलिवूड म्हणू नका तर सगळ्यात भारतातल्या सिनेमा सृष्टीला “इंडियन फिल्म इंडस्ट्री” म्हणा असे ते बोलू लागले आहेत.
Bollywood: After the movies of “Bahar” broke the box office, now Bollywood people don’t like the name “Bollywood
महत्त्वाच्या बातम्या
- चांगल्या वास्तू निर्माण करण्यासाठी परस्पर सहयोग महत्वपूर्ण – हबीब खान
- कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग…..
- Somaiya v/s Parab : कोकणात किरीट सोमय्यांचे हातोडा नाट्य; अनिल परबांचे मुंबईतून आव्हान!!; शिवसेना – भाजपचे परस्परविरोधी शक्तिप्रदर्शन!!
- आराेग्य भरती ‘गट-क’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दाेषाराेपत्र दाखल