• Download App
    कोरोनाचा प्रकोप कायम राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर; आशिश शेलारांच्या आरोपावर किशोरी पेडणेकरांचे “शिक्कामोर्तब” BMC polls will be conducted next year in January-February if the COVID situation is under control

    कोरोनाचा प्रकोप कायम राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर; आशिश शेलारांच्या आरोपावर किशोरी पेडणेकरांचे “शिक्कामोर्तब”

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोनाचे कारण देऊन मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजपचे नेते आशिश शेलार यांनी करून काही तास उलटतात ना तोच शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेमके तेच विधान केले आहे. BMC polls will be conducted next year in January-February if the COVID situation is under control

    मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी – फेब्रुवारी २०२२ मध्येच होईल. पण कोरोनाचा प्रकोप थांबला तरच निवडणूक नियोजित वेळेत होईल. अन्यथा ती पुढे ढकलावी लागेल, असे विधान किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आशिश शेलार यांनी केलेल्या आरोपाची पुष्टी करणारेच आहे.

    आशिश शेलार म्हणाले होते, की कोरोनाचे कारण देऊन मुंबई महापालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक आयोगाने ठरवले आणि निवडणूक वेळेतच घेतली तरी भाजप पूर्ण तयार आहे. सामनामध्ये दररोज डायलॉगबाजी केली जाते. आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है.



    शेलार म्हणाले, जनगणनेचे कारण देऊन मुंबईतील वॉर्ड रचना बदलण्याचे कारस्थान सत्ताधारी शिवसेनेकडून रचले जात आहे. कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी सुरू आहेत. २०११ च्या जनगणेनुसार २०१७ ची प्रभागरचना झाली, मग आता त्याच जनगणनेनुसार २०२२ मध्ये प्रभागरचना का? जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करताना जास्त वेळ लागेल, असा त्यामागचा डाव आहे. जितके करता येईल तितके निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

    मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप फेटाळून लावला. कोरोनाचा प्रकोप सगळ्यांना दिसतोय. अशा स्थितीत निवडणूक लोकांवर लादून तो आणखी वाढविण्याची गरज काय, असा सवाल पेडणेकर यांनी केला.

    BMC polls will be conducted next year in January-February if the COVID situation is under control

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस