BMC Elections : बृहन्मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी मात्र एकला चलो रे ची भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार काँग्रेसच्या रणनीती समितीने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला असून यानुसार महापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखचे नाव दिले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. BMC Elections Congress discusses Riteish Deshmukh name for the post of BMC Mayor
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बृहन्मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी मात्र एकला चलो रे ची भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार काँग्रेसच्या रणनीती समितीने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला असून यानुसार महापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखचे नाव दिले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई काँग्रेस स्ट्रॅटेजी कमिटी सचिव गणेश कुमार यादव यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, मुंबईच्या महापौरपदासाठी काही नावांचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देणारा अभिनेता सोनू सूद यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. तथापि, यावर अद्याप कोणत्याही अभिनेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.
अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा द्वितीय चिरंजीव आहे. रितेशचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत, तर धाकटे बंधू धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे रितेश देशमुखसाठी राजकारण नवे नाही. रितेश देशमुख स्वत:सुद्धा यापूर्वी भावांच्या प्रचारासाठी उतरलेला आहे. आता महापौरपदासाठीच्या या चर्चा खऱ्या ठरतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
BMC Elections Congress discusses Riteish Deshmukh name for the post of BMC Mayor
महत्त्वाच्या बातम्या
- सेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीनेही घेतली उडी, नवाब मलिक म्हणतात – हा तर महाराष्ट्राचाच अपमान!
- चंद्रकांतदादांची सबुरीची भाषा, तरीही नारायण राणे आक्रमकच; गुन्हाच केलेला नाही तर ते काय अटक करणार?, आमचे सरकार त्यांच्या “वरती” बघून घेऊ
- दाेन चार दगड मारून गेले यात कसला पुरुषार्थ, बदनामी केली तर गुन्हा दाखल करेल, नारायण राणे यांचा इशारा
- नाशिकमध्ये भाजपच्या बंद कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक; काचा फोडल्या
- खाद्यतेलाला महागाईची फोडणी, किमतीत २० टक्क्यांनी वाढ; डाळींच्याही किमती भडकल्या