• Download App
    मुंबईकरांना यंदा नववर्षाची पार्टी नाहीच! BMC Bans New Year Parties, Gatherings, Celebration Programmes in Mumbai. Details Here

    NO NEW YEAR PARTY : मुंबईकरांना यंदा नववर्षाची पार्टी नाहीच! सेलिब्रेशन करण्यास महापालिकेचा नकार;वाचा नियम

    • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोव्हिड टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. त्यामध्ये राज्यातली कोरोनाची स्थिती आणि पुढे निर्माण होणारा धोका, तसंच उपाययोजना या सगळ्यावर चर्चा झाली. गर्दी झाली तर कोरोनाचं संकट गहिरं होऊ शकतं असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. BMC Bans New Year Parties, Gatherings, Celebration Programmes in Mumbai. Details Here
    • राज्य सरकारने जो नाईट कर्फ्यूचा आदेश काढला आहे त्या व्यतिरिक्त मुंबईत कोणत्याही पार्टीला किंवा गॅदरिंगला परवानगी देता येणार नाही असा नवा आदेश मुंबई महापालिकेने काढला आहे. 
    • शुक्रवारी (25 डिसेंबर) मध्यरात्री पासूनच हा आदेश लागू .

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: मुंबई महानगरपालिकेद्वारे नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत कायदे आणि नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आता आदेश दिले आहेत की 31 डिसेंबरला मुंबईतील बंदिस्त किंवा मोकळ्या जागेवर नव्या वर्षाशी संबंधित कोणत्याही पार्टी किंवा उत्सवाला संमती दिली जाणार नाही.

    राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी असणार आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नवा आदेश दिला आहे. मुंबईत थर्टी फर्स्टची पार्टी बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत कऱण्यासाठी संमती दिली जाणार नाही असं या आदेशात म्हटलंय.



    काय म्हटलं आहे आदेशात?

    बृहन्मुंबईच्या महानगरपालिका हद्दीत नवीन वर्षाचा कोणताही कार्यक्रम/कार्यक्रम/मेळावा/पार्टी/कार्यक्रम किंवा कोणत्याही बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत होण्यास परवानगी दिली जाणार नाही.

    शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय अंमलात असेल. हा आदेश न पाळल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार शिक्षा देण्यात येईल.

    मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय या अनुषंगाने आम्ही हा आदेश काढला आहे असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. या आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्ण संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. कोव्हिड प्रकरणांमध्ये वाढ होऊ नये आणि लोकांना त्याचा पुढे त्रास होऊ नये हे जास्त महत्त्वाचे आहे.

    नवे वर्ष उत्साहात साजरे करण्यासाठी गर्दी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणं आवश्यक आहे असंही महापालिकेने म्हटलं आहे.

    BMC Bans New Year Parties, Gatherings, Celebration Programmes in Mumbai. Details Here

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा