• Download App
    मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला । Blue Bottel Jelifish seen on sea shore In Juhu

    मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर गेले दोन दिवस ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर आढळला आहे. जेली फिशचा दंश वेदनादायक असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील फलक समुद्रकिनारी लावण्यात आले आहेत. Blue Bottel Jelifish seen on sea shore In Juhu

    रविवारी जुहू समुद्रकिनारी ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’चा वावर आढळला. त्यांची संख्या तुलनेने कमी झाली असली, तरी काही ‘जेली फिश’ किनाऱ्यावर येत आहेत. लॉकडाउन काळात किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे; तरीही ‘जेली फिश’पासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात हे मासे किनारी भागात येतात.



    रविवारी ब्लू बॉटल जेलीफिश किनारी भागात आल्याचा अंदाज समुद्री जीव अभ्यासकांनी वर्तवला आहे. याची माहिती मिळताच संस्थेच्या त्यांनी समुद्रकिनारी धाव घेतली. जेलीफिशचा दंश झाल्यास कुणाशी संपर्क करावा किंवा कोणते उपचार घ्यावेत, याबाबतची महत्त्वाची माहिती देण्यात आल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

    Blue Bottel Jelifish seen on sea shore In Juhu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा