अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली.BJP’s Vasant Khandelwal wins in Akola
विशेष प्रतिनिधी
अकोला : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अकोला-बुलडाणा-वाशीममध्ये शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. नागपूरनंतर अकोलाही भाजपने सर केले आहे. भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे.
वसंत खंडेलवाल यांना 438 मत तर शिवसेनेचे (shiv sena) गोपिकीशन बाजोरिया यांना 330 मते मिळालीत.
अकोला मतदारसंघात 98.30 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) लढत होती. अकोला, वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्याच्या संयुक्त मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.
BJP’s Vasant Khandelwal wins in Akola
महत्त्वाच्या बातम्या
- नागालँड-आसाम सीमेवर तणावपूर्ण शांतता; ओटिंगच्या गोळीबाराचे ख्रिसमस, हॉर्नबिलवर सावट
- मुंबईच्या महापौर करिना कपूरवर भडकल्या, दोन लहान मुले तरी इतकं बिनधास्त कशा?
- साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना कशी काय? भाजप नेते अतुल भातखळकर यांचा सवाल
- अहमदनगर : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास भरावा लागणार ‘ एवढा’ दंड ; नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू