नाशिक : भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले.BJP’s trick; Pawar uncle-nephew alliance is not easy; Both are at loggerheads over seat sharing in Pune!!
2017 च्या निवडणुकीत हीच राष्ट्रवादी एक असताना पवार काका – पुतण्यांच्या दोन पक्षांमध्ये जागावाटपाची खेचाखेची झाली नव्हती. उलट निवडणुकीची सगळी सूत्रे अजित पवारांच्या हातात होती. अजित पवारांनीच सगळ्यांची तिकिटे ठरविली आणि बसविली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सगळ्या यश किंवा अपयशाची जबाबदारी अजित पवारांवरच राहिली.
- फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??
पण 2025 च्या निवडणुकीत सगळे चित्र पालटले भाजपने अजितदादांना महायुतीतून दूर सारले. त्यांना पुण्यात एकाकी लढायला लावले. अशावेळी अजितदादांना त्यांच्या काकांचा सहारा घेतल्यावाचून पर्यायच उरला नाही. पण तो सहारा घेताना सुद्धा अजितदादांनी स्वतःच्या अटी शर्ती काकांच्या पक्षावर लादल्या. त्यामुळेच पवार काका पुतण्यांच्या राष्ट्रवादींमध्ये पुण्यातल्या जागावाटपाची खेचाखेची सुरू झाली.
– जागांच्या खेचाखेचीचे प्रस्ताव
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना 65 जागांचा प्रस्ताव दिला तो खुदा अजितदादांनीच सामान्य करून टाकला आमचा पक्ष तुम्हाला 30-35 पेक्षा जास्त जागा देऊ शकत नाही कारण तेवढी तुमची ताकदच नाही, असे अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली. त्यावर आमची सुद्धा ताकद कमी नाही हे पवारांच्या नेत्यांनी अजितदादांना ऐकविल्याचे त्या बातमीत नमूद केले.
– तुतारी चिन्हावरच आघात
त्याचवेळी अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुढे एक नवाच पेच टाकला. आपल्या दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र लढायचे असेल तर तुम्ही सगळे घड्याळ चिन्ह घेऊनच लढा. त्यामुळे आपल्या दोन्ही पक्षांच्या जागा वाढतील, असा दावा अजितदादांनी केला. हा सरळ सरळ शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर आणि पक्षावर आघात ठरला. कारण त्यामुळे पुणे महापालिकेतले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला. तो धोका बाकी कुठल्या पक्षाने नाही, तर खुद्द अजितदादांनीच निर्माण केला.
– भाजपची खेळी
हे सगळे राजकारण भाजपच्या एका खेळीमुळे घडले. भाजपने अजितदादांना महायुतीतून दूरच सारले. त्यांना पुणे महापालिकेत एकाकीपणे लढायला लावले म्हणून अजितदादांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायची वेळ आली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुबळी अवस्था बघून अजितदादांनी त्यांच्यावर कुरघोडी केली. त्यांना कमी जागांमध्ये आटोपण्याचा प्रयत्न केलाच, पण त्याचबरोबर तुतारी चिन्ह आणि पवारांच्या राष्ट्रवादीवर सुद्धा आघात करायचा डाव खेळला. आता या राजकारणाचा निष्कर्ष काय निघतो, हे त्या दोन दिवसांत समजू शकेल.
BJP’s trick; Pawar uncle-nephew alliance is not easy; Both are at loggerheads over seat sharing in Pune!!
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात मुंबई पालिकेच्या जागावाटपाची चर्चा, भाजपला सुप्त इशारा!!
- निवडणुका जिंकणे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही; ते कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून; प्रकाश आंबेडकरांचा वंचितला मंत्र
- भाजप आणि पवारांच्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका; मतदारांना गृहीत धरल्याचा सुद्धा बसू शकतो फटका!!
- Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले-हवा आणीबाणीसारखी, एअर प्युरिफायरवर 18% GST का? हा स्वच्छ नसेल तर कर कमी करा