भाजपचे काँग्रेसीकरण; नवे प्रयोग करतानाही शिस्तीला ग्रहण!!, हेच राजकीय चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले. भाजपने स्वतःच्या विस्तारीकरणाच्या नादात पक्षाचे काँग्रेसीकरण करून घेतले. भाजपने 29 महापालिकांच्या परिक्षेत्रांमध्ये तुफान इन्कमिंग केले. त्यामुळे भाजपने एकही पक्ष सोडला नाही. त्यामुळे इतर पक्षांमध्ये नेत्यांना सत्तेच्या वळचणीची उब मिळाली. एरवी ज्या पक्षांच्या नेत्यांनी भाजप सारख्या पक्षाकडे कधी ढुंकून सुद्धा पाहिले नसते, त्या पक्षाच्या नेत्यांनी विशेषत: पवार संस्कारित नेत्यांनी भाजपची वाट धरली.
प्रयोग जरूर केले, पण…
पुण्यात भाजपने 42 विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. नागपुरात 14 नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. त्यातून भाजपने घराणेशाहीला अटकाव करायचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फार मर्यादित अर्थाने यशस्वी ठरला. कारण यापैकी बहुतेकांनी बंडखोरी करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतःच्या उमेदवारीचे इंधन पुरविले. शिवाय भाजपने आयात केलेल्या नेत्यांच्या घरात अनेकांना उमेदवारी द्यावी लागली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांच्या घरातील सात लोकांना उमेदवारी द्याव्या लागल्या. याखेरीज गिरीश बापट, मुक्ता टिळक, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक यांची सुद्धा घराणेशाही चालवावी लागली.
निष्ठावान कार्यकर्त्यांवरचा अन्याय रस्त्यावर
या सगळ्यात निष्ठावान कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय झाला. याचे मोठे पडसाद छत्रपती संभाजीनगर मध्ये उमटले. एरवी भाजप नावाचा पक्ष शिस्तबद्ध म्हणून ओळखला जात असताना आणि त्या पक्षातली बंडखोरी रस्त्यावर आली. छत्रपती संभाजी नगर मधल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी उपोषण आरंभले इतकेच नाही, तर पक्षाने आम्हाला स्वीकृत नगरसेवक करून घेऊ हे स्टॅम्प पेपर वर लिहून द्यावे, असे सांगण्याची वेळ निष्ठावान कार्यकर्त्यांवर आली. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी राज्यातले मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या गाड्यांवर काळी शाई फेकली. काँग्रेसमध्ये घडणारी बंडखोरी आणि त्या बंडखोरीतून घडणारी रस्त्यावरची लढाई भाजपमध्ये दिसून आली. याचा अर्थ भाजपने राजकीय प्रयोग भरपूर केले, पण ते प्रयोग करताना भाजपच्या नेत्यांना पक्षातील शिस्त टिकवता आली नाही. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पुरेसा न्याय देता आला नाही.
शहरी भागातला विस्तार करताना सुद्धा दमछाक
खरं म्हणजे भाजपा आजही काँग्रेस सरकार सर्व दूर पसरलेला पक्ष आहे असे अजिबात म्हणता येणार नाही भाजपची सदस्य संख्या 14 कोटींच्या आसपास असली तरी पक्षाचा संघटनात्मक पाया हा काँग्रेस सारखा लोक चळवळीत रूपांतरित झाला आहे, असे अजिबात नाही. कारण देशातल्या दक्षिणेतल्या राज्यांतच काय, पण महाराष्ट्रात सुद्धा भाजप काँग्रेस सारखा सर्व दूर पसरलाय, गावागावांमध्ये पोहोचलाय, असे म्हणण्यासारखी अजिबात स्थिती नाही. भाजपला संघटनात्मक विस्तार करण्यासाठी अजून खूप मोठी संधी, पण त्याचबरोबर आव्हान आहे. पण हे आव्हान पेलताना 29 महापालिका सारख्या शहरी भागातच भाजपला पुरते दमायला झाल्याची चिन्हे दिसली आहेत.
असे का घडले??
29 च्या 29 महापालिकांमध्ये भाजपचा विस्तार समप्रमाणात झालाय असेही म्हणता येत नाही. कारण भाजपच्या विस्ताराचे सगळे केंद्रीकरण मुंबई, पुणे नाशिक पट्ट्यात झाले. भाजपचा विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा फैलाव झाला. पण पश्चिम महाराष्ट्रातला शिरकाव मर्यादित ठरला. भाजपने मुंबई, पुणे, नाशिक पट्ट्यात हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेलाच राजकीय त्रास दिला, पण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसी प्रवृत्तीच्या पक्षांना फोडण्यात किंवा त्यांना वठणीवर आणण्यात भाजपला पुरेसे यश आले नाही. जिथे भाजपने काँग्रेसी प्रवृत्तीचे पक्ष फोडले, तिथे भाजपच्या नेत्यांना काँग्रेसी प्रवृत्तीच्या नेत्यांना सत्तेत मोठा वाटा द्यावा लागला. हातात असलेली सत्ता राबवून काँग्रेसी प्रवृत्तीच्या निब्बर नेत्यांना वठणीवर आणण्यात भाजपचे नेते पुरेसे यशस्वी ठरले नाहीत. भाजपच्या केंद्रीय स्तरावरच्या आणि राज्यस्तरावरच्या नेतृत्वाच्या मर्यादा आणि सत्तेची नसलेली सवय त्यासाठी कारणीभूत ठरल्या.
BJP’s transformation into a Congress-like party
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!
- Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबांच्या 5 घरांना आग लावली; दरवाजे बाहेरून बंद होते; पाच संशयितांना अटक
- ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी
- नाशकात भाजपने आमदारांच्या घरातली तिकिटे कापली; पण विधानसभेच्या आयाराम अध्यक्षांच्या घराणेशाहीवर मेहेरबानी!!