पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यासोबतच शौमिका महाडिक यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.BJP’s seat in Mumbai unopposed, Amal Mahadik withdraws candidature
विशेष प्रतिनिधी
मुंबई :महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी धावाधाव सुरु होती. यात कोल्हापूरच्या जागेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान आज अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.
कोल्हापुरात अमल महाडिकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय सलोखा राहवा म्हणून उमेदवारी मागे घेत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय.इथून पुढच्या निवडणुकाही भाजपच्या झेंड्याखालीच लढणार असल्याचंही महाडिक यांनी स्पष्ट केलंय.
धनंजय महाडिक यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यासोबतच शौमिका महाडिक यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर दवेंद्र फडणवीस यांचा दुपारी दीड वाजता फोन आला आणि त्यानंतर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला.
महाडिक यांनी माध्यमांना बोलताना सांगितले की ,मुंबईतली भाजपची जागा बिनरोधी झाली. नंदुरबारची निवडणूकही बिनविरोध झाली. त्याच्या बदल्यात कोल्हापूरची जागा त्यांना द्यावी अशी मागणी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचंही भाजपकडून सांगण्यात आल आहे.सदस्या संख्या चांगली असतानाही पक्षाचा आदेश म्हणून अर्ज मागे घेण्यात आली अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली आहे.