‘’अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांनो, आधी विषय समजून घेतला असता आणि मग बोलला असतात, तर किती बरे झाले असते…?’’ असंही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील राज्य शासनाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषयाचे मूल्यांकन करताना ते एकत्रित मूल्यांकनात धरू नये. त्याचे मूल्यांकन श्रेणीमध्ये करावे, असा निर्णय घेण्यात आला होता. यावरून आता राज्यात राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्त देण्यात आलं आहे. BJPs response to NCPs criticism of the decision taken by the state cabinet regarding Marathi language
भाजपाने म्हटले आहे की, ‘’अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांनो, आधी विषय समजून घेतला असता आणि मग बोलला असतात, तर किती बरे झाले असते…? असो, तुमच्या बुद्धीच्या पलिकडे असेल तर आम्ही समजावून सांगतो… महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे. आठवी, नववी, दहावीतही ती सक्तीचीच आहे.’’
‘’…ती मोगलाई होती’’ म्हणत केशव उपाध्येंचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर!
याचबरोबर, ‘’कुठेही मराठी भाषेचे महत्त्व कमी करणारा निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ मूल्यांकन श्रेणी स्वरूपात तेही आगामी केवळ 3 वर्षांसाठी करण्यास सांगण्यात आले आहे आणि असे पालकांच्याच मागणीवरुन करण्यात आले. जे विद्यार्थी सहावीपर्यंत मराठी तिसरी भाषा (थर्ड लँगवेज) शिकले.त्यांना आठवी, नववीत आणि दहावीत कमी गुण मिळाले, तर अन्य राज्यांच्या तुलनेत सीबीएसई, आयसीएसईचे महाराष्ट्राचेच विद्यार्थी मागे पडतील आणि त्यांना पुढच्या संधी मिळणार नाहीत. इतर राज्यांच्या विद्यार्थ्यांना सर्व संधी मिळतील आणि आपल्या राज्यातील विद्यार्थी मागे पडतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. आता एकेक वर्ष करीत अनुक्रमे आठवी, नववी आणि तिसर्या वर्षी दहावीत सुद्धा मराठीची गुणांचीच परीक्षा होईल आणि तीन वर्षांनी ही श्रेणी पद्धत पूर्णत: बंद होईल.’’ असं भाजपाने म्हटलं आहे.
याशिवाय, ‘’माय मराठीचा झेंडा कधीच कुणापुढे झुकू नये आणि तो सर्वत्र विद्यार्थी रुपाने फडकत रहावा, हाच यामागचा उद्देश आहे. असो, प्रेतांचेही राजकारण करणार्यांना भाषेचा स्वाभिमान कळणार तरी कसा?’’ अशा शब्दांमध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने काय म्हटलं आहे? –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून म्हटले गेले आहे की, ‘’मराठी भाषेचे महत्त्व कमी करणारा शासन निर्णय घेणारे राज्य सरकार मराठीद्रोही दिल्लीपुढे कधीही न झुकणाऱ्या महाराष्ट्राला आपल्या कामगिरीतून सातत्याने झुकवण्याचे काम सध्याच्या राज्यकर्त्यांनी सुरू कले आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नुकताच घेतलेला मंत्रिमंडळ निर्णयही यात भर घालणार आहे.’’
याशिवाय ‘’इतर परीक्षा मंडळातील शाळांमध्ये मराठी भाषेचे मूल्यांकन हे श्रेणी (अ,ब,क,ड) स्वरुपात केले जावे. तसेच सदर मूल्यांकनाचा समावेश या परीक्षा मंडळांच्या इतर विषयांच्या एकत्रित मूल्यांकनात करण्यात येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून मराठी भाषेचा दर्जा खालावण्याची चिन्हं ठळकपणे दिसत आहेत. त्यामुळे सध्याच्या राज्यकर्त्यांना मराठी भाषेविषयी स्वाभिमान राहिलेला नाही, असेच महाराष्ट्रातील नागरिकांना वाटत आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार राज्यात असलेल्या शासकीय आणि खासगी परीक्षा मंडळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला होता. मात्र विद्यमान सरकारने या निर्णयाला मोडीत काढून इतर परीक्षा मंडळातील शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती कळत नकळत जरूरी नसल्याचे आपल्या निर्णयातून अभिप्रेत केले आहे. यातून मराठी भाषेचे महत्त्व कमी करण्यास खतपाणी दिलं गेलंय. ’’ असंही राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
BJPs response to NCPs criticism of the decision taken by the state cabinet regarding Marathi language
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण