‘’… यावरून तुम्ही कोकण विरोधी, महाराष्ट्रद्रोहीच नाही तर देशद्रोही आहात असं वाटू लागलंय.’’ असंही भाजपाने म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी भाजपा कोकणी माणसाचा एवढा द्वेष का करतं? असा सवाल उपस्थित करत नाणार असो की बारसू भाजपा महाराष्ट्रद्वेषी असल्याचं म्हटलं आहे. यावर भाजपाकडून उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. BJPs reply to Uddhav Thackerays criticism
भाजपाने म्हटलं आहे की, ‘’उद्धव ठाकरे तुम्हाला खऱ्या महाराष्ट्रद्रोह्याची ओळख करुन देतो…कसं आहे, तुम्ही ८ ते ९ महिने एसटी बंद ठेवलीत, परिणामी १८० एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या. अहो, कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्यांना देखील सोडलं नाही कफन घोटाळा करुन मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाऊन ढेकर दिलात. कोरोना काळात लोकं रस्त्यावर अक्षरशः तडफडून मरत होती त्यांना ऍम्ब्युलन्स सुध्दा उपलब्ध करुन दिली नाही. कोरोना रुग्ण उपचाराशिवाय मरत होते आणि तुम्ही जम्बो सेंटर फक्त आणि फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी बांधून रिकामी ठेवलीत.’’
‘’तुम्ही एवढ्या कोत्या मनाचे होतात की तुम्ही पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळू नये याची तुम्ही व्यवस्थाच करून ठेवली होती. शेतकऱ्यांनी आणि केंद्राने त्यांच्या हिश्याचे पीक विम्याचे हफ्ते भरले होते, मात्र तुम्ही राज्य सरकारच्या हिश्याचे पैसे भरलेच नाही. परिणामी इंशुरंन्स कंपन्यांचे तिजोऱ्या भरल्या आणि शेतकऱ्यांना फुटकी कवडीसुध्दा दिली नाही. तुम्ही शेतकऱ्यांसोबत बेईमानी केली. तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहात, कारण तुम्ही मराठी तरुणांच्या हक्काची पोलीस भरती थांबवली आणि लोकांच्या सुरक्षेचा विचारही केला नाहीत. ’’
‘’अडीच वर्षाच्या काळात दहशतवाद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण केलं म्हणूनच तर PFI, ISIS चे अड्डे महाराष्ट्रात निर्माण झाले. उमेश कोल्हेची हत्येला चोरीचं स्वरुप देऊन जिहाद्यांना पाठीशी घातलं. सर्जिल उस्मानीला पोलीस सुरक्षेत महाराष्ट्राबाहेर काढलं. पालघर साधुंच्या हत्यांकांडात मौन बाळगलं. ज्या कोकणातल्या साध्या भोळ्या माणसाबद्दल तुम्ही आपुलकी दाखवत आहात, त्या माणसांची दिशाभूल करुन त्यांनासुध्दा तुम्ही फसवलंत. कोकणी माणसाच्या समृध्द बनवणाऱ्या काजू बोंड प्रक्रिया केंद्रांना कुलूपं घातली… रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात भीतीचं साम्राज्य निर्माण करत त्यांना विकासापासून दूर करत आहात. ’’
‘’उध्दव ठाकरे, तुमच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही कोकणासाठी काय केलं, याचं एक उदाहरण द्या? राज्यासाठी काय केलंत? अहंकारातून महाराष्ट्रात होणाऱ्या विकास प्रकल्प ठप्प करुन तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहात हे सिध्द केलं. आपल्या कोकणातल्या प्रकल्पाचे परदेशी गुंतवणूकदार तुम्ही पाकिस्तानात पाठवलेत. पाकिस्तानाला अर्थिक पाठबळ देण्यासाठी? तुमच्या या प्रकल्पाच्या विरोधावरुन तुम्ही कोकण विरोधी, महाराष्ट्रद्रोहीच नाही तर देशद्रोही आहात असं वाटू लागलंय. ’’
BJPs reply to Uddhav Thackerays criticism
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद, लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू
- राहुल गांधी कायद्याच्या नजरेत दोषीच, फक्त शिक्षेला स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात; महेश जेठमलानींनी मांडली वस्तूस्थिती!!
- २०३० पर्यंत देशात ८०० ‘वंदे भारत’ ट्रेन धावतील, आर के सिंह यांनी सांगितली सरकारची योजना
- आयुष्यातलं सगळ्यात पहिलं नाटक पाहून सैराट फेम रिंकू भावुक, डोळ्यात पाणी आणि मी स्तब्ध असं म्हणत शेअर केल्या भावना