• Download App
    BJP's own strength is a blow to Shinde - Ajit, but this is the wisdom of the Marathi media! म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे - अजितदादांना धडकी,

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!

    Shinde - Ajit

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!, असं म्हणायची वेळ मराठी माध्यमांनी दिलेल्या अल्प बुध्दी बातम्यांमुळे आली.BJP’s own strength is a blow to Shinde – Ajit, but this is the wisdom of the Marathi media!!

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह परवाच मुंबईत येऊन गेले आणि त्यांनी भाजपला कुणाच्या कुबड्या नकोत, असे विधान केले. वास्तविक त्या विधानात नवीन काहीच नव्हते, पण दुसरे काही सापडले नाही म्हणून मराठी माध्यमांनी त्यात बरेच काही between the lines असल्यासारखे वाचले आणि त्यातून बातम्या देऊन बरेच “बौद्धिक” पाजळले. भाजपच्या स्वबळाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धडकी भरल्याचा दावा मराठी माध्यमांनी केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार जणू काही राजकारणात बोळ्यानेच दूध पितात, असा आव आणला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाच महायुतीची गरज आहे आणि भाजपला त्यांची अजिबात गरज नाही, असे मराठी माध्यमांनी बातम्यांमधून भासवून दाखविले.



    स्वबळाची तयारी आधीपासूनच

    वास्तविक भाजपच्या स्वबळाचा मुद्दा बिलकुल नवीन नाही. त्यांची 2019 पासून तशीच तयारी सुरू आहे. स्वबळाच्या आधीचा टप्पा म्हणूनच भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांकडे मित्रपक्ष म्हणून पाहतोय. हे जसे भाजपच्या नेत्यांना माहिती आहे, त्यापेक्षाही ते अधिक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही माहिती आहे, तरी देखील हे दोन्ही नेते राजकीय चतुराई आणि सामंजस्याने भाजपच्या नेतृत्वाशी जुळवून महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला बसलेत. सत्तेत राहून ते आपले राजकारण साधून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केलेली बातचीत हे त्याचे प्रतीक आहे.

     निकालानंतर महायुती घट्ट

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या इतर कुठल्याही मोठ्या निवडणुकांपेक्षा वेगळ्याच असतात तिथे कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाचा जमिनी पातळीवर विस्तार करायची सगळ्यात मोठी संधी असते हे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना पक्के माहिती आहे. किंबहुना भाजपचे केंद्रीय नेते राज्य पातळीवरचे मुख्य नेते आणि शिंदे यांच्या शिवसेनेतले तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सगळे नेते यांचे तसे आधीपासून ठरलेही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्यतो स्वबळावर लढवा. जमिनी पातळीवरचे स्वबळ वाढवा आणि गरज पडल्यास निवडणुकीनंतर युती करून सत्तेची पदे मिळवा, हा धोरणात्मक निर्णय या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी कुठेही जाहीरपणे न बोलता परस्पर घेऊन टाकलाय.

    निर्णय नवा नाही

    या निर्णयात सुद्धा काही नवीन नाही कारण 1990 च्या दशकापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधल्या स्पर्धा तीव्र झाल्यानंतर निवडणूक मतदानापूर्वीच्या आघाड्या आणि मतदानानंतरच्या आघाड्या यांच्यात फार मोठा बदल झाल्याचे दिसून आले. ते 2025 आणि 20626 च्या निवडणुका नंतरही येणार आहे. महायुतीतील घटक पक्षांनी शक्य तिथे महायुती करून आणि ताकदीचा अंदाज घेऊन इतरत्र स्वबळावर निवडणुका लढवायच्या आणि निवडणुकीनंतर सगळीकडेच सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने adjustments करायच्या या नेत्यांनी ठरविले आहे.

    धडकी बिडकी काही नाही

    म्हणूनच अमित शाह यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना स्वबळाचा नारा देणे यात विशेष काही घडले नाही. अमित शाह यांच्या भाषणाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धडकी भरायचे सुद्धा काही कारण नाही. तशी ती भरलेली सुद्धा नाही. या दोघांच्या पक्षांच्या मेळाव्यांमधल्या त्यांच्या भाषणातून ते दिसून आले. कारण दोघेही नेते “तयार” आहेत. त्यांना आपली ताकद आणि मर्यादा दोन्ही माहिती आहेत. त्यांच्या वकुबानुसार आणि भाजपच्या इच्छेनुसार ते भाजपा बरोबर राजकीय वाटचाल करत राहतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सगळ्या विरोधी पक्षांची political space खाऊन टाकतील, हे यातले खरे राजकीय इंगित आहे. मात्र, बुद्धीची कडकी असलेल्या मराठी माध्यमांना ते इंगित दिसले नाही, इतकेच…!!

    BJP’s own strength is a blow to Shinde – Ajit, but this is the wisdom of the Marathi media!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा

    Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका

    मुंबई क्लायमेट वीक मध्ये होणार जागतिक वातावरण बदलावर विचार मंथन; इंडियन मेरीटाइम वीक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा