नाशिक : महाराष्ट्र विधानसभेतले आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पद मिळावे म्हणून संख्याबळ कमी असलेले विरोधक फारच उतावळे झाले असताना भाजपने एक खेळी करून महाविकास आघाडीत पाचर मारली.BJP’s Maha Vikas Aghadi is being wedged in by changing the names of the posts of Leader of Opposition!!
भाजपने विरोधी पक्षनेते पदांवरची नावे बदलून वेगळ्याच नेत्यांना विरोधी पक्षनेते पदे द्यायची तयारी दाखवली त्यामुळे महाविकास आघाडीत त्या नावावरून वाद सुरू झाले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होण्याच्या पूर्वीच विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून फडणवीस सरकारला घेरले. पण त्यावेळी त्यांनी भाजपवर प्रहार करण्याऐवजी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले. विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद विरोधकांना द्यायचे नसेल, तर घटनाबाह्य उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठलाही राजकीय ओरखडा उठला नाही पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उपमुख्यमंत्री पद गोत्यात आले.
– भास्कर जाधवांची गोची
त्यापाठोपाठ भास्कर जाधव यांनी फडणवीस सरकारला घेरले. शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे नाव त्यांनी स्वतःच पुढे केले. परंतु, आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा काल रंगली आदित्य ठाकरे यांच्या नावाची सोंगटी भाजपच्याच गोटातून पुढे करण्यात आल्याचे बोलले गेले. त्यामुळे भास्कर जाधव यांना आपण आदित्य ठाकरे यांच्यासाठी एका क्षणात विरोधी पक्षनेते पद सोडून देऊ, असे म्हणावे लागले.
– वडेट्टीवार आणि परब यांची नावे समोर
काल दिवसभर आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी चर्चेत ठेवल्यानंतर आज अचानक काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी पुढे आले. किंबहुना ते आणले गेले. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पद द्यायचे, तर विधान परिषदेत अनिल परब यांना ते पद द्यायचे, असा प्रस्ताव भाजपने दिल्याचे सांगण्यात आले. विधान परिषदेत काँग्रेसचे नेते सतेज पाटील विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही असताना अचानक भाजपने शिवसेनेच्या अनिल परब यांचे नाव समोर आणले. विधानसभेत विरोधकांमध्ये शिवसेनेचे सगळ्यात जास्त आमदार आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळणे अपेक्षित असताना भाजपने काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचे नाव पुढे केले, तर विधान परिषदेत काँग्रेसच्या सतेज पाटलांना विरोधी पक्ष नेते पद मिळणे अपेक्षित असताना भाजपने शिवसेनेच्या अनिल परब यांचे नाव समोर आणले. ही दोन्ही वेगळीच नावे समोर आणून भाजपने महाविकास आघाडी पाचर मारून ठेवली.
BJP’s Maha Vikas Aghadi is being wedged in by changing the names of the posts of Leader of Opposition!!
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन
- वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!
- राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
- निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा