• Download App
    चक्रीवादळग्रस्तांचे नुकसान जाणून घेण्यासाठी भाजपाचे सिटीझन जर्नालिझम, नुकसानग्रस्तांकडून प्रत्यक्ष |BJP's Citizen Journalism to know the losses of cyclone victims, direct from the victims

    चक्रीवादळग्रस्तांचे नुकसान जाणून घेण्यासाठी भाजपाचे सिटीझन जर्नालिझम, नुकसानग्रस्तांकडून प्रत्यक्ष

    राज्यातील मोठ्या भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मात्र, अद्यापही शासकीय यंत्रणा ढिम्म आहे. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळेच चक्रीवादळाने खरोखर नुकसान झालेल्यांची माहिती गोळा करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सिटीझन जर्नालिझम केले जात आहे. लोक स्वत:हून आपल्या नुकसानीची माहिती देऊ शकणार आहेत.BJP’s Citizen Journalism to know the losses of cyclone victims, direct from the victims


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील मोठ्या भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मात्र, अद्यापही शासकीय यंत्रणा ढिम्म आहे. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत.

    त्यामुळेच चक्रीवादळाने खरोखर नुकसान झालेल्यांची माहिती गोळा करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सिटीझन जर्नालिझम केले जात आहे. लोक स्वत:हून आपल्या नुकसानीची माहिती देऊ शकणार आहेत.



    चक्रवादळानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी दौरे करत आहेत. मात्र, नुकसानाची तीव्रता इतकी मोठी आहे की सगळ्याच ठिकाणी पोहोचता येणे शक्य नाही. शासनाकडे संपूर्ण यंत्रणा आहे परंतु त्यांच्याकडून खरी माहिती येण्याची शक्यता कमी आहे.

    त्यामुळे लोकांनाच आपल्या नुकसानीची माहिती देता यावी यासाठी भाजपाने यंत्रणा तयार केली आहे. शहरी भागातील सिटीझन जर्नालिझमच्या धर्तीवर ही यंत्रणा काम करणार आहे.

    यासाठी महाराष्ट्र राज्य भाजपाकडून ‘द फिफ्थ पिलर’ (पाचवा खांब) नावाने सोशल मीडियावर एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यामध्ये फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅलनचा समावेश आहे.

    यावर नुकसानग्रस्त आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती लिखित स्वरुपात किंवा व्हिडीओच्या माध्यमातून देऊ शकतात. चक्रीवादळाने झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती त्याचप्रमाणे शासनाकडून मिळालेली मदत याबाबत सांगू शकतात.

    भाजपाने या उपक्रमाला पक्षीय चेहरा दिलेला नाही. सर्वांसाठी माध्यम असे म्हटले आहे. हा पाचवा खांब समाजाच्या भल्यासाठी विधायक काम करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

    भाजपाचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, तोक्ते चक्रीवादळात लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, त्यांच्याकडे अद्यापही शासन लक्ष देत नाही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामेही झशलेले नाहीत. काही ठिकाणी पंचनामे झाले परंतु नुकसान खूपच कमी दाखविले आहे.

    आम्ही या सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या नुकसानीचे प्रत्यक्ष व्हिडीओ पाठवावेत. त्याचबरोबर काय नुकसान झाले याची माहिती आणि फोटो पाठवावे. त्यासाठी फेसबुक पेज, यू ट्यूब चॅनलसोबतच आम्ही व्हॉटसअ‍ॅप नंबरही दिला आहे.

    यावर आलेले फोटो, व्हिडीओ आणि माहिती द फिफ्थ पिलर पेजवर टाकली जाईल. भाजपाने व्हॉटसअ‍ॅपवर पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांनीच माहिती पाठवावी. त्यामुळे सिटीझन जर्नालिझम प्रत्यक्षात येईल.

    त्याचबरोबर यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य किंवा टीका टाळावी. देवेंद्र फडणवीस यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग जिल्ह्यांचा गेल्या तीन दिवसांपासून दौरा केला. या तीनही जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झाल्याचे त्यांना दिसले.

    त्यानंतर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या भागाचा दौरा केला. परंतु, तीन तासांतच आपला दौरा आटोपला होता.

    BJP’s Citizen Journalism to know the losses of cyclone victims, direct from the victims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!