प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे या दोन विधानसभेतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ जानेवारीला या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. २७ फेब्रुवारीला या दोन्ही जागांसाठी मतदान झाले असून गुरुवारी, २ मार्चला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.BJP’s citadel will collapse in the town, sweat will break out in Chinchwad too; Sanjay Raut’s claim
२० फेऱ्यांपैकी आतापर्यंत कसब्यातील दहाव्या आणि चिंचवडमधील नवव्या फेरीचे निकाल समोर आले आहेत.
यामध्ये कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आघाडीवर असून भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर असून मविआचे नाना काटे पिछाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवरून बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘कसब्यातील भाजपचा गड कोसळणार असून चिंचवडमध्येही भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.’
प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘ज्या कसब्यात गेले ४० वर्ष भारतीय जनता पक्ष हा फक्त शिवसेनेच्या पाठिंब्याने जिंकून आलेला आहे. आज शिवसेना महाविकास आघाडीची घटक आहे, आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय. तसेच चिंचवड मतदारसंघात शेवटपर्यंत भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. कसब्यातला भाजपचा गड कोसळणार आहे. चिंचवड हा भाजपचा गड नसून तिथे एका कुटुंबाची मक्तेदारी आहे. तिथे पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो.’
कसब्यातील दहावी फेरी
मविआ : रवींद्र धंगेकर : ३८,२८६ मते : आघाडी
भाजप : हेमंत रासने : ३४,०२२ मते : पिछाडी
चिंचवडमधील नववी फेरी
भाजप : अश्विनी जगताप : ३२,२८८ मते : आघाडी
मविआ : नाना काटे : २५,९२२ मते : पिछाडी
अपक्षाचे राहुल कलाटे : १०,७०५ मते : पिछाडी
BJP’s citadel will collapse in the town, sweat will break out in Chinchwad too; Sanjay Raut’s claim
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही
- केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही
- आमदार अपात्र ठरले असते तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- Election 2023 : त्रिपुरा, मेघालय, नागालँड निवडणुकीचे समीकरण जाणून घ्या एका क्लिकवर!