Swpanil Lonkar Suicide case : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत धुळे पोलीस अधिक्षक यांच्याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा, धुळे यांनी केली आहे. BJP Youth Morcha Dhule demands FIR against CM and dy CM in Swpanil Lonkar Suicide case
विशेष प्रतिनिधी
धुळे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत धुळे पोलीस अधिक्षक यांच्याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा, धुळे यांनी केली आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्यास लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संयम संपत आल्याचे राज्यात या दुर्दवी घटनेमुळे दिसून येत आहे. यामुळे एमपीएससीसंदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करू नये, या तरुणाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकीरपणा जबाबदार आहे. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर IPC कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा तसेच ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना रोहित चांदोडे (भाजपा युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष) यांनी केली आहे.
BJP Youth Morcha Dhule demands FIR against CM and dy CM in Swpanil Lonkar Suicide case
महत्त्वाच्या बातम्या
- OBC इम्पिरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर प्रहार
- नेमणुका करता येत नसतील तर एमपीएससीच्या परीक्षा घेता कशाला?, खा. संभाजीराजेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र
- Monsoon session 2021 : देवेंद्र फडणवीसांनी वाचली स्वप्नीलची सुसाइड नोट, मुनगंटीवारांचा सरकारवर हल्लाबोल
- FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला, जूनमध्ये भारतीय बाजारात तब्बल 13,269 कोटींची गुंतवणूक
- जळगावातील शिवसेनेचा आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत; राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्याने खळबळ