• Download App
    BJP will reject nawab Malik's अजितदादा नवाब मलिकांचे बस्तान

    Mawab Malik’ : अजितदादा नवाब मलिकांचे बस्तान पुन्हा बसवायाच्या बेतात; पण भाजप काय करणार??

    nawab Malik's

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर दाऊद इब्राहिमच्या म्होरक्यांशी मनी लॉन्ड्रीग करणाऱ्या नवाब मलिक यांचे पुन्हा राजकीय बस्तान बसवणार असतील, तर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतील??, असा सवाल आज स्वातंत्र्यदिनी तयार झाला आहे. याला कारण नवाब मलिक ( nawab Malik ) यांचे एक ट्विटच ठरले आहे.

    त्याचे झाले असे :

    नवाब मलिकांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांचे जुने चिन्ह घड्याळच वापरले. या घड्याळ वापरण्यातून त्यांनी आपण अजित पवारांच्या पक्षात असल्याचे सूचित केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक आमचेच आहेत. त्यामुळे त्यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यात गैर काय??, असा सवाल करत मलिकांचे समर्थन केले.



    मराठी माध्यमांनी याच्या मोठ्या बातम्या दिल्या. नवाब मलिक यांनी फैसला केला, दादा की साहेब??, त्यांनी घड्याळ चिन्ह वापरल्याने ते दादांकडे आल्याचे बातम्यांमध्ये नमूद केले. पण त्यामुळेच नवाब मलिक यांच्या राजकीय अस्तित्व संदर्भात भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नाची चर्चा समोर आली.

    वैद्यकीय जामीन मिळून तुरुंगाबाहेर आल्यानंतर नवाब मलिक नागपूरच्या अधिवेशनात हजर राहायला होते. त्यावेळी ते सत्ताधारी महायुतीच्या बाकांवर बसले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब त्यावर आक्षेप घेऊन अजित पवारांना पत्र लिहिले होते. नवाब मलिक महायुतीत नकोत, अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी त्या पत्रात नमूद केली होती. त्यामुळे अजित पवार आणि नवाब मलिक यांची कोंडी झाली. नबाब मलिक त्यानंतर अधिवेशनातून काही काळ गायब झाले. ते पुन्हा अधिवेशनाकडे फिरकले नाहीत. त्याचबरोबर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायच्या फंदात देखील ते पडले नाहीत.

    दाऊद इब्राहिमच्या म्होरक्यांशी मनी लॉन्ड्रीग करून जमीन गैरव्यवहार केल्याबद्दल त्यांच्यावर केस सुरू आहे. ते सध्या वैद्यकीय जामीनावर आहेत. ते सध्या पॉलिटिकली फारसे ऍक्टिव्ह नाहीत. मात्र विधानसभा निवडणुका जवळ आल्याने आपले स्वतःचे नाहीतर आपल्या मुलीचे अणुशक्तीनगर मतदारसंघातून राजकीय बस्तान बसवावे या हेतूने त्यांनी परत एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आपली अस्तित्वाची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना घड्याळ चिन्ह वापरले.

    पण त्यामुळेच आता ते अडचणीत आले. नवाब मलिक यांनी अजितदादांच्या कुठल्याही राजकीय घडामोडी भाग घेण्यात भाजप आक्षेप घेण्याची शक्यता कमी आहे, पण अजितदादांनी नवाब मलिकांना तिकीट देऊन त्यांचे राजकीय बस्तान पुन्हा बसवायचा प्रयत्न केला, तर मात्र भाजप त्यावर आक्षेप घेऊन नबाब मलिक यांना बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे घड्याळ चिन्ह वापरून नवाब मलिक यांनी लिपमस्ट टेस्ट केली असली, तरी प्रत्यक्षात निवडणूक तिकीट मिळते की नाही??, यावर त्यांची खरी राजकीय परीक्षा असणार आहे. त्या परीक्षेत त्यांना पास होऊ द्यायचे की नाही??, हे अजित पवारंपेक्षा भाजप ठरवणार आहे.

    BJP will reject nawab Malik’s political rehabilitation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक