चंद्रकांत पाटील यांनी संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.BJP will provide free three-month ration to ST employees
विशेष प्रतिनिधी
सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारशी चर्चा करून संपावर तोडगा काढावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यावर असताना केली आहे.
दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या वतीने संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे रेशन देण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आहे.पुढे चंद्रकांत पाटील यांनी संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या व्याथा पाटलांसमोर मांडल्या. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र असे न करता सरकारने देखील कामगारांच्या व्याथा समजावून घेतल्या पाहिजे.