प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद दरम्यान मुंबईत नऊ ठिकाणी बस फोडण्यात आल्या. ठाण्यात उपमहापौरांच्या पतीने रिक्षाचालकांना मारहाण केल्याची घटना पुढे आली. जळगाव, भुसावळ तसेच अन्य शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदची दखल उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी पत्रकार परिषदेत मागणी देखील केली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप आता ठाकरे – पवार सरकारच्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे.BJP will go to the high court
या बंदमध्ये झालेले नुकसान शिवसेना – राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीरपणे पुकारलेला होता. त्यामुळे येत्या ३ दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांच्या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. या बंदमध्ये झालेले नुकसान या तीनही पक्षांकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
या आधी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारने सुप्रीम सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांची पायमल्ली केली आहे, असा आरोप केला होता. महाराष्ट्रात ज्यांच्यावर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनी कॅबिनेटमध्ये बैठकीत महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला. याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बंद नव्हे राजकीय ढोंग!
महाभकास आघाडी सरकारने लखीमपूर घटनेचे भांडवल करत आधीच बंद असलेला महाराष्ट्र आज पुन्हा एकदा यांच्या कर्तृत्वाने बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जनतेने हा बंद नाकारला, कारण लोकांना माहित आहे की, हे राजकीय ढोंग आहे. मराठवाड्यातील शेतक-यांना मदत नाही, साधी भेटही दिली नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण या भागातील शेतक-यांना अजून मदत देण्यात आली नाही. त्यांच्या घटक पक्षातील सदस्य राजू शेट्टी त्यांच्यावर टीका करतात. अशा वेळी उत्तर प्रदेशातील घटनेवर तुम्ही मगरीचे अश्रू ढाळता. त्यामुळे जनतेने हा बंद नाकारला. फक्त काही ठिकाणी गुंडगिरी करून, पोलिसांच्या मदतीने धाकदपटशहा करून बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही अयशस्वी झाला आहे, असे आमदार भातखळकर म्हणाले.
BJP will go to the high court
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू