• Download App
    आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप न्यायालयात दाद मागणार|BJP will appeal to the court against the suspension of MLAs

    आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप न्यायालयात दाद मागणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने, षड्यं्त्र रचून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे भाजप नेते आणि निलंबित आमदार ॲड. आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.BJP will appeal to the court against the suspension of MLAs

    ते म्हणाले, कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करता शिक्षा घेणारे आम्ही बारा विधानसभा सदस्य असून नैसर्गिक न्यायाला धरून आमची बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला आहे.



    निलंबित झालेल्या १२ आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक झाली. यावेळी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगत निलंबनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

    शेलार म्हणाले, की दोन दिवसांच्या अधिवेशनात १२ आमदारांचे झालेले निलंबन हे एक षड्यंेत्र असून सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान पडद्यामागे जे घडले, त्यातील धक्कादायक माहिती आमच्यापर्यंत येत आहे.

    ती योग्य वेळी आम्ही उघड करू. निलंबित करण्यात आलेले आमदार या घटनेत नव्हते. कारण तशी घटनाच घडली नाही. म्हणून हे एक राजकीय षड्यंघत्र आहे.

    BJP will appeal to the court against the suspension of MLAs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक