विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी छोट्या घटक पक्षांना घेऊन त्यांना काही ना, काही राजकीय लाभ देऊ, असे सांगत शरद पवारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. परंतु ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12 आमदारांच्या बळावर जयंत पाटलांना विधान परिषदेत पाठवू शकले नाहीत.BJP to make dhairyashil patil rajyasabha MP
महाविकास आघाडीच्या मोठ्या घटक पक्षांवर शरद पवार पुरेसा प्रभाव पाडू शकले नाहीत. जयंत पाटलांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. त्यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले.
जयंत पाटील ज्या शेतकरी कामगार पक्षातून आणि रायगड जिल्ह्यातून येतात, त्याच रायगड जिल्ह्यातले त्यांचेच जुने सहकारी धैर्यशील पाटलांना मात्र भाजप आता खासदार करणार आहे. धैर्यशील पाटील हे पेणचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. परंतु 2023 मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडत भारतीय जनता पक्षाची कास धरली. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची रायगड जिल्ह्यातील ताकद वाढली. आता भाजपने धैर्यशील पाटलांना लोकप्रतिनिधीत्वाची ताकद देण्याचे ठरवून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोकणातली भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने ही खेळी महत्वाची ठरली आहे.
एकीकडे शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना शब्द देऊन देखील शरद पवार त्यांना विधान परिषदेवर आमदार करू शकले नाहीत. परंतु, त्यांचेच जुने सहकारी धैर्यशील पाटलांना शब्द न देता ही भाजप राज्यसभेवर पाठवून त्यांचे बळ वाढवणार आहे.
BJP to make dhairyashil patil rajyasabha MP
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde : मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
- Narendra modi :पंतप्रधान मोदी जगाला चकित करणार, रशियानंतर आता थेट युक्रेनला जाणार!
- Monkey Pox Principal Secretary : ‘मंकी पॉक्स’बाबत मोठी बैठक, प्रधान सचिव म्हणाले परिस्थितीवर पंतप्रधानांची नजर!
- Vishwa Hindu Parishad : मागासवर्गीयांना आपलेसे करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची देशभरात तब्बल 9000 ब्लॉक मध्ये धर्मसभा आणि संमेलने!!