काल रात्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले होते, त्यावरून जोरदार प्रतिक्रिया समोर येत आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दररोज अचंबित करणाऱ्या घडामोडी दिसत आहेत. कधी मातोश्री सोडून अन्य नेत्याच्या भेटीसाठी त्याच्या दारी न जाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काल शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत होते. तर, शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या. ही भेट राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण, मागील काही दिवसांपासून शरद पवारांकडून येत असलेली विधानं पाहता, महाविकास आघाडीत सारं काही नक्कीच आलबेल नाही, असंच दिसून येत आहे. त्यामुळे या भेटीनंतर आता विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. BJP State President Chandrasekhar Bawankules reaction on Uddhav Thackeray and Sharad Pawars Silver Oak meeting
छत्रपती संभाजीनगरात पत्रकारपरिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘’मला वाटतं की त्यांची महाविकास आघाडी आहे, त्यांनी त्यांच्या घरी बैठक घ्यावी की त्यांनी यांच्या घरी यावं, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण यापूर्वी असं काही घडायचं नाही. यापूर्वी जेव्हा २५ वर्षे आमची युती होती, तेव्हा मातोश्री बाहेर निघून कुणी बाहेर बैठकीला जात नव्हतं. चांगलं झालं की, मोदींच्या नेतृत्वात भारतात प्रगल्भ लोकशाही आता आली आहे. आता उद्धव ठाकरे सुद्धा मातोश्रीच्या बाहेर पडून, दुसरीकडे जाऊन बैठका घ्यायला लागले आहेत. हे लोकाशाहीसाठी चांगलं आहे.’’
याशिवाय राष्ट्रवादीकडून आता भाजपाला सहमत अशी भूमिका घेतली जात आहे आणि अशीही चर्चा सुरू आहे की, जर १६ आमदार अपात्र ठरले तर त्यानंतर सरकारा होणारी अडचण ही राष्ट्रवादीकडून दूर होईल, म्हणून चर्चा सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘’मला वाटतं जीवनात जर तरला काही अर्थ नसतो, खरंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, त्या निकालावर आतापासून प्रश्नचिन्ह उभा करणे, हे काही योग्य नाही. मला वाटतं की आज जी शिवसेना-भाजपा युती आहे, हेच महाराष्ट्राचं मत आहे, जनतेचं कल्याण भाजपा-सेना युतीच करू शकते, असं जनतेचंही मत आहे.’’
याचबरोबर ‘’उद्धव ठाकरे पवारांकडे का गेले, कशासाठी गेले, त्यांची बैठक कशामुळे झाली. हे त्या दोघांनाच माहिती, मी कशा माहिती काढू की दोघांमध्ये काय चर्चा झाली? मी आमचा पक्ष वाढवण्यासाठी काम करतोय. जर उद्या कुठेही निवडणूक लागली तर त्यासाठी आम्ही सर्वजण तयारी करत आहोत.’’ असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
BJP State President Chandrasekhar Bawankules reaction on Uddhav Thackeray and Sharad Pawars Silver Oak meeting
महत्वाच्या बातम्या
- हेट स्पीचप्रकरणी राहुल गांधींची पाटणा कोर्टात हजेरी, सुशील मोदींनी दाखल केला होता खटला; सुरत कोर्टाकडून यापूर्वीच शिक्षा
- ट्विटरचे एक्स कॉर्पमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, एलन मस्क यांचे सूचक ट्विट, 20 एप्रिलला हटणार ब्लू टिक
- लाऊडस्पीकरवर अजानला बंदी, आज जनहित याचिकेवर गुजरात हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार सादर करणार उत्तर
- वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!