‘’मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा.’’ असा टोलाही लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपा, पंतप्रधान मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विविध आरोप, टीका करत आहेत. विशेषता मोदींना हुकुमशाह संबोधत आहेत. वज्रमूठ सभेतील भाषणातून तर ते टीका करताना अगदी टोकाची विधानही करताना दिसून आले आहे. त्यांच्या या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहं. BJP State President Chandrasekhar Bawankule responded to Uddhav Thackerays criticism
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, ‘’उद्धव ठाकरे हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? तुमच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्रानं बघितलं आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणे यांना तुरुंगात टाकलं, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणं, याला हुकूमशाही म्हणतात. तुमच्या विरोधात बोललं म्हणून पत्रकाराला घरातून अटक करणं याला हुकूमशाही म्हणतात. विरोधात भूमिका घेतली म्हणून अभिनेत्रीचं घर तोडणं याला हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा.’’
याचबरोबर ‘’राहिला प्रश्न ‘जय बजरंगबली‘ नारा देण्याचा तर आम्हाला ‘जय श्रीराम‘ आणि ‘जय बजरंगबली‘ जयघोष करण्याचा अभिमान आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून तुम्हाला मात्र हिंदुत्वाचा विसर पडला आहे. रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला तुम्ही साधं ट्विट करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली‘चा नारा दिल्यावर दुःख वाटणं साहजिकच आहे. कारण तुम्ही आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात.’’ असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
BJP State President Chandrasekhar Bawankule responded to Uddhav Thackerays criticism
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नाही!!; याचा अर्थ 2024 पर्यंत पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष??; बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेबांची कॉपी??
- मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो; उद्धव ठाकरेंचे पवारांना प्रत्युत्तर
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शरद पवारांचं मोठं विधान! कार्यकर्त्यांना म्हणाले ‘’दोन दिवसानंतर तुम्हाला…’’
- Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?