• Download App
    राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेते, आमचे शिवसेनेशीही वैर नाही; चंद्रकांत पाटील यांचे यूतीबाबत सूचक वक्तव्य । BJP State President Chandrakant Patil Comment On MNS Chief Raj Thackeray in Nashik

    राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेते, आमचे शिवसेनेशीही वैर नाही; चंद्रकांत पाटील यांचे यूतीबाबत सूचक वक्तव्य

    Chandrakant Patil Comment On MNS Chief Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिकसारख्या महापालिकेवर वर्चस्व राखण्यासाठी दिग्गज नेतेमंडळींनी शहराला भेटी देणे सुरू केले आहे. मनसेपाठोपाठ आता भाजपनेही येथे सक्रियता वाढवली आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवेसनेशी आमचे वैर नाही पण आमचा विरोध सरकारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांबद्दलचे आपले धोरण बदलत नाही तोपर्यंत आमची त्यांच्याशी युती होणे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असेलेले नेते आहेत. ते महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकत नाही. BJP State President Chandrakant Patil Comment On MNS Chief Raj Thackeray in Nashik


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिकसारख्या महापालिकेवर वर्चस्व राखण्यासाठी दिग्गज नेतेमंडळींनी शहराला भेटी देणे सुरू केले आहे. मनसेपाठोपाठ आता भाजपनेही येथे सक्रियता वाढवली आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवेसनेशी आमचे वैर नाही पण आमचा विरोध सरकारला आहे

    राज ठाकरे महाराष्ट्राला हवे असलेले नेते

    चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेते आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांबद्दलचे आपले धोरण बदलत नाही तोपर्यंत आमची त्यांच्याशी युती होणे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असेलेले नेते आहेत. ते महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकत नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो’

    नाशिकमधील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी चंद्रकांत पाटील शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भविष्यातील शिवसेना-भाजप युतीबाबतही सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना ईडीच्या कारवाईबाबत विचारले असता ते म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कारवाईबाबत अधिक बोलता येणार नाही. परंतु कोणत्याही एका नेत्याला मध्यरात्री अटक होऊ शकते. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा रोख हा प्रामुख्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    BJP State President Chandrakant Patil Comment On MNS Chief Raj Thackeray in Nashik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!