आमदार नितीन देशमुखांना झालेल्या अटकेवरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर केली होती टीका
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. अकोलाच्या पाणी प्रश्नासांठी त्यांनी अकोला ते नागपूर अशी जलसंघर्ष यात्रा काढली होती. मात्र त्यांना नागपूरच्या सीमेवरच पोलिसांनी रोखलं आणि ताब्यात घेतलं. देशमुख यांनी या यात्रेसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. परंतु या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. ज्याला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे. BJP spokesperson Keshav Upadhyeys reply to MP Sanjay Rauts criticism
‘’अडीच वर्ष ऑनलाईन सरकारनं कोविड काळात महाराष्ट्राला जे दाखवलं ती मोगलाई होती. साधू संतांची हत्या करण्यात आली, ती मोगलाई होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय दिला, ती मोगलाई होती. सुशांत सिंग राजपूत आणि ड्रग्स केस मध्ये जे झालं, ती मोगलाई होती. केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं, ती मोगलाई होती.’’ असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते? –
‘’पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली. नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भातपाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली सरकार जनतेलाच घाबरु लागले!’’ अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली होती.
BJP spokesperson Keshav Upadhyeys reply to MP Sanjay Rauts criticism
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण