Jalyukt Shivar : राज्यातील जलयुक्त शिवार योजनेवरून महाविकास आघाडी सरकारने क्लीन चिट दिली आहे. सरकारच्या जलसंधारण विभागाने यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. नाशिकमध्ये ते पत्रकरांशी बोलत होते. BJP Spokesperson Keshav Upadhye Criticizes Thackeray Govt on Jalyukt Shivar Issue
प्रतिनिधी
नाशिक : राज्यातील जलयुक्त शिवार योजनेवरून महाविकास आघाडी सरकारने क्लीन चिट दिली आहे. सरकारच्या जलसंधारण विभागाने यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. नाशिकमध्ये ते पत्रकरांशी बोलत होते.
उपाध्ये म्हणाले की, विश्वासघातानं सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे . लोकसहभागातून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेची यशस्विता मोठी होती. राज्यात 13 लाख कामं झाली. यातील 500 ते 700 कामात काही त्रुटी आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा आज अहवाल आला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला हे स्पष्ट झालं आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय हे अहवालात स्पष्ट दिसतंय.
ते पुढे म्हणाले की, चांगल्या योजनेला आघाडी सरकारने बदनाम केलं. सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी व त्यांना मदत करायला हवी होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतजमीन सुपीक झाली. सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात केला निदान शेतकऱ्यांचा तरी करू नका. माजी गृहमंत्री फरार आहे, ही महाराष्ट्राची बदनामी आहे. अनिल देशमुखांसाठी शरद पवार यांनी 2 पत्रकार परिषदा घेतल्या आणि गृहमंत्री फरार कुठे? हे माहिती नाही. पेट्रोल, डिझेल जीएसटीत आणा ही भाजपची मागणी आहे. दर कमी होऊ शकतात मात्र या बैठकीला अजित पवार गेलेच नाहीत, असेही उपाध्ये म्हणाले.
BJP Spokesperson Keshav Upadhye Criticizes Thackeray Govt on Jalyukt Shivar Issue
महत्त्वाच्या बातम्या
- जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचेच दात घशात गेले; आमदार आशिष शेलार यांचा टोला
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
- जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारची क्लीन चिट, अभियानामुळे झाली भूजल पातळीत वाढ, फडणवीस म्हणतात…
- राज्यातील शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर , पण संभ्रम कायम
- नवाब मलिक यांना एनसीबीविरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका, एजन्सीचे मनोबल कमी करण्याचा आरोप