‘’साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत’’ केशव उपाध्येंनी लगावला टोला
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर आणि ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. याशिवाय लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे,संजय राऊतांना टोलाही लगावला आहे. संजय राऊतांकडून भाजपावर केल्या जाणाऱ्या टीकेला हे प्रत्युत्तर आहे. BJP spokesperson Keshav Upadhye criticism of Thackeray group and Sanjay Raut
केशव उपाध्ये म्हणाले, ‘’महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे. उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वत:हून पडलेली ‘लव्ह जिहाद’ची बळी आहे. हिंदुत्ववादी विचार सोडून शिल्लक सेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जी फरफट होतेय, तोही एक प्रकारचा लव्ह जिहादच आहे. त्यामुळे शिल्लक सेनेला आसपासचं भगव्याऐवजी हिरवं दिसायला लागलंय. शिल्लक सेना स्वतःचं किती अधःपतन करुन घेणार आहे.’’
याशिवाय ‘’अहो, राऊत… आमचं सोडा…. तुमच्या सोबत असणाऱ्या अबू आझमीला औरंग्या प्रिय आहे, आता तो तुम्हालाही वाटायला लागलाय का? कारण त्यावर तुम्ही तोंड उघडलेलं नाही. साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत.’’ असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाने नेमकी काय टीका केली? –
‘’महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत. आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व खतऱ्यात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपाचे व मिंध्यांचे राजकारण. सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल.’’ अशी टीका शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
BJP spokesperson Keshav Upadhye criticism of Thackeray group and Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- राघव चढ्ढा : “नको सरकारी बंगला” ते “हवा मोठाच बंगला”; आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा राजकीय प्रवास!!
- Wrestler Protest Row : ‘’ब्रिजभूषण सिंह विरोधात खोटी तक्रार दाखल’’ अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचा मोठा दावा!
- मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच जितेंद्र आव्हाडांचा संताप; दिली मुंब्रा बंदची धमकी!!
- मीरा भाईंदर निर्घृण हत्याकांड आणि सिलेक्टिव्ह राजकीय मानसिकता!!