• Download App
    ‘’...तुमच्यासारख्या ‘मातोश्री’च्या तुंबड्या त्यांनी भरल्या नाहीत’’ केशव उपाध्येंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!BJP spokesperson Keshav Upadhyay criticized Uddhav Thackeray Because he criticized Prime Minister Modi

    ‘’…तुमच्यासारख्या ‘मातोश्री’च्या तुंबड्या त्यांनी भरल्या नाहीत’’ केशव उपाध्येंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

    (संग्रहित)

    पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भाजपा आक्रमक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जळगावमधील पाचोरा येथे काल उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान मोदी, भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी भाषणात बोलताना पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला. यावरून भाजपाने उद्ध ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. BJP spokesperson Keshav Upadhyay criticized Uddhav Thackeray Because he criticized Prime Minister Modi

    भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी म्हटले की, ‘’उध्दव ठाकरे, तुमच्या तेच ते बोलण्याला कंटाळून सभेला माणसं नाही खुर्च्या असतात. पण काल तुम्ही कमालच केली. बाळासाहेब ठाकरे ज्याचा कायम पाकड्या म्हणून उल्लेख करायचे, त्या पाकिस्तानबद्दल तुम्ही आदराने बोलता, त्यांची साक्ष काढता? ‘’

    याचबरोबर ‘’देशाची जनता ज्या मोदींसोबत आहे त्यांचा उल्लेख एकेरी करता? किमान त्यांच्या पदाचा तरी मान राखणं तुम्हाला जमलं नाही का? ते जनतेच्या कृपेने पंतप्रधान झालेत, तुमच्या सारखं विचार सोडून धोका देऊन नाहीत झाले. होय मोदी झोला लेकेच आले होते. कारण मोदी निस्वार्थपणे काम करताय जनतेचे काम करतात तुमच्या सारखे मातोश्रीच्या तुंबड्या त्यांनी भरल्या नाहीत. ‘’ अशा शब्दांमध्ये केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

    काय म्हणाले उद्धव ठाकरे? –

    “ते(मोदी) घराणेशाहीबद्दल बोलतात, परंतु घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय?’’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

    BJP spokesperson Keshav Upadhyay criticized Uddhav Thackeray Because he criticized Prime Minister Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा