• Download App
    ‘’... ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’ भाजपाचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र! BJP spokesperson Keshav Upadhyay criticized Uddhav Thackeray

    ‘’… ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’ भाजपाचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

    (संग्रहित)

    ‘’राजकीय महत्वकांक्षा सर्वोच्च ठेऊन मुख्यमंत्री झालात, किमान…’’ असा टोलीही लगावला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  :  राज्यातील  सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निर्णय दिला. त्यानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडताना, अपेक्षेप्रमाणे राज्यपाल आणि शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावर आता भाजपाकडून पलटवार करण्यात आला आहे. BJP spokesperson Keshav Upadhyay criticized Uddhav Thackeray

    भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी  म्हटले की, ‘’आता उद्धव ठाकरे एकीकडे न्याय मेला नाहीये म्हणतात, आणि दुसरीकडे महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे म्हणतायत. नक्की काय म्हणायचं आहे ? नैतिकतेला जागून राजीनामा दिला म्हणता, ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती. राजकीय महत्वकांक्षा सर्वोच्च ठेऊन मुख्यमंत्री झालात, किमान सरकार तर धीटपणे चालवायचं. विचारधारा सोडली, पक्षातले साथीदार सोडून गेले, तरी नाही समजलं एवढा अहंकार मोठा कसा झाला?’’

    याचबरोबर ‘’भारतीय जनता पक्षाने कोणालाही फोडून कोणाच्याही दावणीला बांधलं नाहीये. दावणीला बांधणं काय असतं, हे अडीच वर्षात मविआ काळात सगळ्या जनतेनं बघितलं आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेसाठी विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत जाणं, म्हणजे दावणीला बांधणं असतं. वेळ गेली असली, तरी अजूनही विचार करा.’’ असंही उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

    उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? –

    ‘’मी नैतिकतेला जागून माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, मी आजही माझ्या या निर्णयावर समाधानी आहे. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टाने उघड केला. महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. सरकारला मिळालेलं जीवदान हे तात्पुरते असून सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ.’’,असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

    BJP spokesperson Keshav Upadhyay criticized Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा