विशेष प्रतिनिधी
पुणे :रिपब्लिकन पक्ष असताना भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. भाजपाला मनसेमुळे नुकसान होऊ शकते, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.BJP should not take MNS with it, it will be harmed due to the issue of marathi, warns Ramdas Athavale
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी आरपीआयला पुण्यात महापौर पद आणि मुंबईत उपमहापौर पद मिळावं, अशी मागणी केली. ते म्हणाले, भाजपला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपाचं नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये.
आम्ही भाजपाचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाही. राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहणार आहे. पुण्यात महापौर पद मिळालं पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. पुण्यात 15 ते 20, तर मुबंईमध्ये 30 ते 35 जागा मिळाल्या पाहिजेत.
BJP should not take MNS with it, it will be harmed due to the issue of marathi, warns Ramdas Athavale
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप उभा करेल सिल्वासात उभा छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात उचलले मोठे पाऊल , 50 कोटींचा मानहानीचा दाखल केला खटला
- भारताने कोरोना लसीकरणात 99 कोटींचा टप्पा गाठला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली माहिती
- ‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
- CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा