विशेष प्रतिनिधी
मुंबई :BJP Shiv Sena Shinde राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे. भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.BJP Shiv Sena Shinde
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जगांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.BJP Shiv Sena Shinde
भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचेही 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपची विजयी घोडदौड
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंकर, मंदा पाटील यांच्यासह आता ज्योती पवन पाटील या 24 ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्योती पवन पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या भाजप उमेदवारांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. याचे श्रेय रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला दिले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचेही वर्चस्व
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पॅनल क्र. 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्र. 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदारे राजेश मोरे यांचे हर्षल मोरे हे चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या निवडणुका बिनविरोध झाल्या. तसेच याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे.
राज्यभरात महायुतीच्या 13 जागा बिनविरोध
कल्याण डोंबिवलीसह राज्यभरातही महायुतीची घोडदौड सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने धुळे महानगरपालिकेत 2, पनवेल महानगरपालिकेत 1 जागा बिनविरोध करत, राज्यात 8 जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत 4, जळगावमध्ये 1 जागा बिनविरोध करत राज्यभरात 5 जागा बिनविरोध केल्या आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अहिल्यानगरमध्ये एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण 13 जागा बिनविरोध झाल्या असल्याचे दिसून येत आहे.
BJP Shiv Sena Shinde Win Unopposed KDMC Election PHOTOS VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी चिंचवडच्या विकासाचे सारथी लक्ष्मण जगताप यांच्या शक्तिस्थळ’चे लोकार्पण
- Indigo : इंडिगोवर ₹458 कोटींहून अधिकचा जीएसटी दंड; एअरलाइनने म्हटले- आदेशाला आव्हान देणार
- Army Animal : प्रजासत्ताक दिनी सैन्याची पशु तुकडी देखील परेड करणार; बॅक्ट्रियन उंट, झांस्कर टट्टू, रॅप्टर्स आणि श्वान मार्च करतील
- एक हँडशेक केला, तर पाकिस्तान हुरळला, चर्चेसाठी भारताच्या कच्छपी लागला!!