• Download App
    भाजप - शिवसेनेचे जागा वाटप झालेले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा BJP-Shiv Sena seats not distributed; Disclosure of Chandrasekhar Bawankule

    भाजप – शिवसेनेचे जागा वाटप झालेले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजप – शिवसेना यांचे विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप झाले नसून कोणतेही सूत्र ठरले नसल्याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला आहे. BJP-Shiv Sena seats not distributed; Disclosure of Chandrasekhar Bawankule

    आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिका-यांना निवडणूक तयारीच्यादृष्टीने मार्गदर्शन करताना केले होते. निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचा विचार होईल. शिवसेनेसोबत असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

    – भाषण काढून टाकले

    भाजप 240 जागा लढणार असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी पक्षाचे प्रवक्ते व अन्य पदाधिका-यांपुढे बोलताना केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली. शिवसेनेच्या वाट्याला 48 जागाच येणार याबाबत चर्चा सुरु झाल्याने, वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत हस्तक्षेप केल्यावर हे भाषण काढून टाकले. त्यानंतर स्वतः बावनकुळे यांनी पुढे येऊन भाजप शिवसेना यांच्यातले जागावाटप झाले नसल्याचा खुलासा केला आहे.

    BJP-Shiv Sena seats not distributed; Disclosure of Chandrasekhar Bawankule

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस