• Download App
    BJP sets target of 45 - 50 % plus vote share in maharashtra

    महाराष्ट्रात भाजपचे टार्गेट सेट; 45 % प्लस मतांसाठी सर्व नेते – कार्यकर्ते हिरीरीने मैदानात!!

    प्रतिनिधी

    मुंबई : नाशिक मध्ये भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक सुरू झाल्यावर पक्षाने महाराष्ट्रातले राजकीय टार्गेट सेट केले आहे. कोणताही पक्ष फोडणे किंवा युती – आघाडी करणे या पलिकडचे टार्गेट महाराष्ट्र भाजपने ठेवले असून महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणुकांमध्ये फक्त भाजपलाच 45 ते 50 % मते मिळविण्याचे टार्गेट नेते आणि कार्यकर्त्यांनी सेट केले आहे. BJP sets target of 45 – 50 % plus vote share in maharashtra

    या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत हे सुतोवाच केले. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा तावडे यांनी घेतला. महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीत भाजपला 28% शिवसेनेला 19 % काँग्रेसला 18 % तर राष्ट्रवादी काँग्रेसला 17 % मते मिळाली होती. शिवसेनेने त्यावेळी भाजप बरोबर युती करून 19 % मिळवली होती. पण नंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर घरोबा केला. त्यामुळे शिवसेनेची हिंदुत्ववादी मते भाजपकडेच वळणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने स्वतःच्याच मतांची टक्केवारी 45 ते 50 % पर्यंत वाढविण्याचे टार्गेट नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहे.


    विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पहिला विजय; कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी


    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा हा संघटनात्मक पातळीवरचा आणि जनतेत जाऊन मतांची टक्केवारी वाढविण्याचा हा विस्तार कार्यक्रम आहे, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

    भाजप इतर पक्षातल्या नेत्यांना घेऊन स्वतःचा विस्तार करणार का या प्रश्नावर उत्तर देताना विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे सुरू असून त्यावर आधारित पक्षाचा विस्तार करण्यासंदर्भात भाष्य केले. विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्याचा सर्व भर भाजपची मतांची टक्केवारी वाढविण्यावरच होता. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर सरकार स्थापन केले आणि आजही ते महाविकास आघाडी बरोबरच असल्याची भाषा वापरत आहेत त्यामुळे शिवसेनेची उरलेली हिंदुत्ववादी मते देखील भाजपकडे खेचून घेण्याची संधी या निमित्ताने पक्षाला मिळत असल्याचेच विनोद तावडे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

    BJP sets target of 45 – 50 % plus vote share in maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!