• Download App
    BJP Sees भाजपमध्ये इनकमिंग सुरूच, अजित पवार गटालाही धक्का

    BJP Sees : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच, अजित पवार गटालाही धक्का

    BJP Sees

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : BJP Sees आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला सुरूच असून, माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच काँग्रेसलाही आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपकडून विविध पक्षांतील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.BJP Sees

    हा पक्षप्रवेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे आणि शहर भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.BJP Sees



    माजी उपमहापौर दिलीप बराटे हे वारजे भागाचे माजी लोकप्रतिनिधी असून, गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ ते पुण्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. भाजपमध्ये प्रवेश करताना बराटे यांनी आपण उमेदवारीसाठी आलेलो नसल्याचे स्पष्ट केले. पूर्वी पतित पावन संघटनेत काम केल्याचा अनुभव सांगत त्यांनी सामाजिक कार्याशी आपली नाळ जोडलेली असल्याचे नमूद केले. तसेच त्यांचा पुतण्या सध्या भाजपमध्ये सक्रिय असून आगामी निवडणूक लढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    दरम्यान, माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आहेत. सन २००७ मध्ये वानवडी प्रभागातून ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर काही काळ राजकीय सक्रियतेपासून दूर राहिल्यानंतर चौदा वर्षांच्या अंतराने त्यांनी पुन्हा राजकीय प्रवास सुरू केल्याचे सांगितले. हा प्रवास भाजपमधून सुरू करत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    पक्षप्रवेशावेळी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी बराटे आणि शिवरकर यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा पक्षाला फायदा होईल, अशी भावना व्यक्त केली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलताना दिलीप बराटे यांचा प्रदीर्घ अनुभव भाजपसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले. तसेच अभिजीत शिवरकर यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता पक्षात दाखल झाल्याने वानवडी परिसरात भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरू असलेले हे इनकमिंग सत्ताधारी पक्षांसह विरोधकांसाठीही महत्त्वाचे मानले जात आहे. अनुभवी नेते आणि नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचा समन्वय साधत भाजप निवडणुकीत आघाडी घेण्याच्या तयारीत असल्याचे या पक्षप्रवेशातून स्पष्ट होत आहे.

    BJP Sees Fresh Influx As Ajit Pawar Camp Suffers Setback

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mahayuti Seat : महायुतीत भाजप-शिवसेना शिंदे गट जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम

    मालेगावात वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढायची घोषणा; पण त्यात इस्लाम पक्ष सामील!!

    आता उरले अदानींपुरते!!