”…त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारू नयेत.” असंही भाजपाने म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ( ठाकरे गट ) आणि समाजवादी विचारांच्या पक्षांची बैठक काल ( १५ ऑक्टोबर ) पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. ज्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले गेले आहे. BJP responded to Uddhav Thackerays criticism
भाजपाने म्हटले आहे की, ”घराणेशाहीच्या जीवावर पद उपभोगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी यांनी आज कथित समाजवाद्यांसोबत येऊन लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारल्या. हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारू नयेत.”
याशिवाय, ”सत्तेत असताना अडीच वर्षे जे उद्धव ठाकरे घरात बसून होते ते उद्धव ठाकरे मोदीजींनी गेल्या साडेनऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत आणि होऊ दे चर्चा म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांना चर्चा करायचीच असेल तर १०० कोटी वसुली, कोविड काळातील घोटाळे, पत्राचाळ घोटाळा, वाझे की लादेन?, यावर एकदा चर्चा होऊन जाऊ द्या.” असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे.
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे? –
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना आणि भाजपाची युती तोडण्याचं कारण काय होतं? आता शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यानं सवाल उपस्थित केले जातील. जर, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर भाजपा फुलांचा वर्षांव करत असेल मग, मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का? तुम्हाला गाडण्यासाठी आमच्यातील मतभेद गाडून टाकले आहेत. काय बोलता बोला?”
BJP responded to Uddhav Thackerays criticism
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!